Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन कोटींची खंडणी द्या, नाहीतर…; विमा कंपनीला धमकीचा ई-मेल

प्रसिद्ध विमा कंपनीला तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ई-मेल पाठविण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 28, 2025 | 04:29 PM
तीन कोटींची खंडणी द्या, नाहीतर...; विमा कंपनीला धमकीचा ई-मेल

तीन कोटींची खंडणी द्या, नाहीतर...; विमा कंपनीला धमकीचा ई-मेल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रसिद्ध विमा कंपनीला तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ई-मेल पाठविण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली असून, खंडणी न दिल्यास कंपनीची महत्त्वाची माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू आहे.

लोअर परळ येथील पेनिनसुला पार्क येथील कंपनीला आठवड्‌याभरापूर्वी ई-मेल प्राप्त झाला होता. ई-मेल करणाऱ्या व्यक्तीने कंपनीचा डेटा सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ४.२ बिटकॉईनची (सुमारे तीन कोटी रुपये) मागणी केली. ती रक्कम न दिल्यास डेटा सार्वजनिक करून कंपनीचे नुकसान करू, अशी धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे खंडणीसाठी ई-मेल पाठवणारी व्यक्ती व त्याला कंपनीचा गोपनीय डेटा पुरवणाऱ्यांविरोधात कंपनीने तक्रार केली आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीच्या वतीने जी. पद्माकर त्रिपाठी यांनी मंगळवारी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३), ३५१ (२) सह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क) व ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. कंपनीने स्वतः या प्रकरणातील तपासणी करून पोलिसांना माहिती दिली. आता पोलीस ई-मेलच्या मदतीने तपास करीत आहेत. त्यासाठी सायबर विभागातील सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. कंपनीचा गोपनीय डेटा आरोपीकडे असल्यामुळे कंपनीशी संबंधित व्यक्तीच्या सहभागाबाबतही तपासणी केली जात आहे.

सायबर खंडणीचा प्रकार

सायबर खंडणी हा प्रकार भारताला नवा नाही. परदेशात ‘डेटा थेफ्ट’चे अनेक किस्से गाजले आहेत. ‘डेटा थेफ्ट’ च्या संकल्पनेवर हॉलिवुडमध्ये अनेक चित्रपटही बनले आहेत. व्यावसायिक कंपन्यांसोबत सरकारी विभागांतील सर्वर हॅक केल्यास सुरक्षा व्यवस्थेची कशी दाणादाण उडू शकते, याचे चित्रही या चित्रपटांतून उभे करण्यात आले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र असे प्रकार सर्रास सुरू असल्याने कंपन्या अनेक विविध पातळ्यांवर दक्षता घेत आहे. पण हॅकर्स त्यावरही मात करतात. अंतर्गत व्यक्तीच्या सहभागामुळे ‘डेटा थेफ्ट’ची प्रकरणे घडतात. त्याद्वारे कंपनीकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी मागितली जाते. अन्यथा माहिती सार्वजनिक अथवा प्रतिस्पर्धी कंपनींना देण्याची धमकी दिली जाते. मुंबईत यापूर्वी घडलेल्या ‘डेटा थेफ्ट’च्या प्रकरणांमध्ये कंपनीतील माजी कर्मचान्यांनीच डेटा चोरल्याचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: Information has emerged that an email was sent to the insurance company for ransom nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 04:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.