Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहपाठ न केल्यामुळे अमानुष शिक्षा, चौथीच्या विद्यार्थिनींचे पायच सुजले; ४ दिवसांपासून चालण्यास त्रास

गृहपाठ न केल्यामुळे इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थिनींना शिक्षिकेने अमानुष शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे, हि घटना पालघर येथे घडली असून विद्यार्थिनीला चार दिवसापासून चालण्यास त्रास होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2025 | 08:33 AM
punishment (फोटो सौजन्य- pinterest)

punishment (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गृहपाठ न केल्यामुळे इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थिनींना जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षिकेने अमानुष शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून विद्यार्थिनी त्रस्त आहेत. ‘मी जोपर्यंत वर्गात बोलवत नाही, तोपर्यंत उठाबशा काढा’, अशी शिक्षा विद्यार्थिनींना दिली. त्यामुळे ३ विद्यार्थिनींच्या पायाला जास्त प्रमाणात सूज आली असून, चार दिवसांपासून त्यांना चालण्यास त्रास होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

बुधवारी शाळेच्या वेळेत विद्यार्थिनींना शिक्षा देण्यात आली. जास्त प्रमाणात उठाबशा काढल्यामुळे संध्याकाळपर्यंत विद्यार्थिनींच्या पायांना जास्त प्रमाणात सूज येऊन रात्रभर त्यांना त्रास सहन करावा लागला. दुसऱ्या दिवशी मुलींना त्रास सहन होत नसल्यामुळे शिक्षकवृंदाने त्यांना दवाखान्यात नेले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.

आम्ही वीटभट्टीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो. आम्हाला शिक्षण घेणे शक्य झाले नाही, त्यामुळे आमच्या मुलीला शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मुलीला शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर शाळेत ठेवले. मात्र शिक्षिकेकडून आमच्या मुलीला अमानुष शिक्षा देण्यात आली. या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. -संदीप तल्हा, पालक

विद्यार्थिनींनी गृहपाठ केला नसल्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयामार्फत एक समूह पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून योग्य चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. -सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी, डहाणू

पाच मिनिटे उशिरा पोहोचल्याने कठोर शिक्षा

असाच एक प्रकार १७ जानेवारी रोजी पालघरमधील टेंभोडे गावात घडला. १०वीत शिकणारी विद्यार्थिनी सकाळी पाच मिनिटे उशिरा शाळेत पोहोचली.म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला शिक्षा म्हणून ५० पुश-अप्स करण्यास सांगितले. शिक्षेनंतर, विद्यार्थिनीला पाय आणि मांड्यांमध्ये तीव्र वेदना आणि पोटात वेदना जाणवू लागल्या. नंतर तिला उलट्या होऊ लागल्या, ज्यामुळे तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिने तिथे तीन दिवस उपचार घेतले. पालघरमधील भगिनी समाज विद्यालयातील ही घटना आहे. विशेषतः तिच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्याने तिच्या पालकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Web Title: Inhuman punishment for not doing homework fourth grade students feet swelled difficulty walking for 4 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • Teacher

संबंधित बातम्या

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…
1

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या
2

Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या

लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…! शिक्षक दिनानिमित्त गुरूंना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा
3

लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…! शिक्षक दिनानिमित्त गुरूंना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर
4

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.