हरयाणा : हरियाणातील बहुचर्तित तांत्रिक जलेबी बाबा (Jalebi Baba) सेक्स स्कँडल प्रकरणी (Sex scandle ) मोठी अपडेट आहे. तांत्रिक जलेबी बाबा उर्फ अमरपुरी याला मंगळवारी न्यायालयाने 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जलेबी बाबावर महिलांना चहामध्ये नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याचा आरोप होता.
[read_also content=”युपीतील ‘या’ शहरासाठी थंडी ठरतेय जीवघेणी! गेल्या 9 दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने 130 जणांचा मृत्यू,हृदयरोगांमध्येही वाढ https://www.navarashtra.com/india/130-people-died-of-heart-attack-in-last-9-days-in-kanpur-uttarpradesh-nrps-360875.html”]
फतेहाबादच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने तोहानाच्या प्रसिद्ध जलेबी बाबा सेक्स स्कँडल प्रकरणात दोषी ठरलेल्या बिल्लुराम उर्फ अमरपुरी याच्या विरोधात शिक्षेची घोषणा केली आहे. न्यायालयाने बाबाला 14 वर्षे कारावास, 35 हजार दंड, 376C मध्ये 7-7 वर्षे, POCSO कायद्यात 14 वर्षे आणि 67 IT कायद्यात 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जलेबी बाबावर महिलांना चहामध्ये नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याचा आणि त्यांना ब्लॅकमेलही करायचा. बाबा अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याला न्यायालयाने ५ जानेवारी रोजी दोषी ठरवले होते. 6 जानेवारीला शिक्षेवर झालेल्या चर्चेनंतर 9 जानेवारीला शिक्षेची घोषणा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र 10 जानेवारी रोजी न्यायालयाने निकाल दिला. यावेळी बाबा कोर्टात खूप रडलाही होता. न्यायाधीशांसमोर दयेचे आवाहन केले होते मात्र, न्यायालयाने काल निकाल देत त्याला शिक्षा सुनावली.
बाबाचे महिलांसोबतचे 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर आले होते. या खटल्यात 6 पीडितांनी पीडित म्हणून न्यायालयात हजर राहून बाबाच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला. नंतर तिन्ही पीडितांच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाचा निर्णय आला.
19 जुलै 2018 रोजी टोहाना शहर पोलिसांनी तत्कालीन स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून बाबा बालकनाथ डेराचे बाबा बिल्लुराम उर्फ अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याच्याविरुद्ध आयपीसीच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप कुमारच्या मोबाईलवर एका माहितीदाराने जलेबी बाबाचा अश्लील व्हिडिओ दाखवला होता. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 120 व्हिडिओ आढळले, ज्यामध्ये जलेबी बाबा महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत होता. उपचाराच्या बहाण्याने नशेच्या गोळ्या खाऊ घातल्याचेही समोर आले होते. पोलिसांच्या चौकशीत जलेबी बाबाने सांगितले की, तो त्याच्याजवळ येणाऱ्या महिलांना आमिष दाखवून त्यांना गोळ्या खाऊ घालून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा आणि मोबाईलवरून व्हिडिओ बनवायचा. नंतर त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले. बदनामीच्या भीतीमुळे महिला कोणाला काही सांगू शकत नव्हत्या.मात्र, 13 ऑक्टोबर 2017 रोजी महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिस टोहाणा येथे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 328, 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अमरवीर सुमारे 20 वर्षांपूर्वी तोहानामध्ये आला होता. येथे आल्यानंतर त्यांनी टोहना येथील नेहरू मार्केटमध्ये जिलेबीचा स्टॉल लावला. जिलेबीचा धंदा चांगला चालल्यावर त्यांनी गजरेला वगैरे बनवायला सुरुवात केली आणि काम वाढवले. दुकानाला अमरवीरचे पंजाबी गिफ्ट्स असे नावही देण्यात आले होते. हा व्यवसाय 10 वर्षे चांगला चालला. यादरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. कुटुंबात चार मुली आणि दोन मुले आहेत. यादरम्यान पंजाबमधून एक तांत्रिक आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी अमरवीर यांना तांत्रिक विद्याविषयी माहिती दिली. यानंतर अमरवीर दोन वर्षे तोहाणा येथून गायब झाला. नंतर तो टोहणा येथे परतला आणि प्रभाग क्रमांक १९ मध्ये घर घेतले. तेथे त्यांनी बाबा बालकनाथ यांच्या नावाने मंदिर बांधले आणि त्यासोबत त्यांचे घर बांधले आणि मुलांसह येथे राहू लागले. इथून त्याची बाबा बनण्याची कहाणी सुरु झाली. अमरवीरने आपले नाव बदलून अमरपुरी ठेवले. लोकांचे दु:ख, त्रास दूर करण्यात येईल, असा फलक लावण्यात आला. त्यानंतर तांत्रिक विद्याची जादू सुरू झाली आणि लोकांची गर्दी जमू लागली. आणि पैसैही बऱ्यापैकी मिळू लागले. यादरम्यान त्याने पंजाबमध्ये 6 मुलींसह काही मुलांची लग्नही लावून दिली. त्यामुळे अल्पावधीत बाबा लोकप्रिय झाला.