Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime News: जळगाव हादरले!बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह; मैत्रीतील वादातून खुनाचा संशय

काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेत असलेल्या पोलिसांसमोर अखेर धक्कादायक वास्तव आले. मोबाईल लोकेशन, मैत्रीतील वाद आणि जंगलात सापडलेला मृतदेह यामुळे या प्रकरणाचा तपास थेट खुनाच्या दिशेने वळला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 15, 2026 | 04:33 PM
Jalgaon Crime News: जळगाव हादरले!बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह; मैत्रीतील वादातून खुनाचा संशय

Jalgaon Crime News: जळगाव हादरले!बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह; मैत्रीतील वादातून खुनाचा संशय

Follow Us
Follow Us:
  • ८ सप्टेंबरपासून बेपत्ता कविता मिस्त्री यांचा १३ सप्टेंबरला जंगलात मृतदेह
  • मैत्रीतील वादातून खुनाचा संशय; नरेश सोनवणे ताब्यात
  • मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास; अन्य सहभागाचा शोध सुरू
जळगाव: शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह पद्मालयच्या जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कविता अरुण मिस्त्री असे मृत महिलेचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह जंगल परिसरात आढळला. प्राथमिक तपासात त्यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नरेश ऊर्फ आबा अनिल सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा:Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!

८ सप्टेंबरपासून होत्या बेपत्ता

कविता मिस्त्री ८ सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे महिलेचा शोध सुरू केला.

मैत्रीतील वादाकडे पोलिसांचे लक्ष

तपासादरम्यान पोलिसांचे लक्ष कविता आणि नरेश सोनवणे यांच्या संबंधांकडे गेले. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कविता बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये वाद झाल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. ८ सप्टेंबर रोजी नरेशने कविताला दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर दोघे दुचाकीवरून निघाले. याचदरम्यान कविताने मैत्रिणींशी व्हिडिओ कॉल करून आपण नरेशसोबत जात असल्याचे सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

हेही वाचा: Pune News: केंद्रीय मंत्री मोहोळांच्या सुरक्षा ताफ्याला भरधाव दुचाकीचा कट; ३२ वर्षीय दुचाकीस्वारावर गुन्हा

दोघांचे मोबाईल लोकेशन एकाच ठिकाणी

पोलिसांनी कविता आणि नरेश यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यामध्ये दोन्ही मोबाईलचे शेवटचे लोकेशन म्हसावद परिसरात आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही मोबाईल बंद झाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी पद्मालय परिसरातील जंगलात कविता यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या स्थितीवरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर आधी दाखल असलेल्या अपहरणाच्या प्रकरणाचा तपास खुनाच्या दिशेने वळवण्यात आला.

संशयित ताब्यात; कारणाचा शोध सुरू

तांत्रिक माहिती आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे नरेश ऊर्फ आबा सोनवणे याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेण्यात आले. जुन्या संबंधातील वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची माहिती दिली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण, घटनेच्या वेळी काय घडले आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. संशयिताविरोधात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनीसह जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Jalgaon missing woman kavita mistry death padmalaya forest suspect detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.