सौजन्य फोटो - सोशल मिडीया,Gemini
पोलीस कर्मचारी ईश्वर भिकुले यांच्या तक्रारीनुसार, नाना पेठ येथील शुभम विजय वनित (वय ३२) याने दुचाकी भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत सुरक्षा ताफ्याला कट मारला. ताफ्याची वाहतूक सुरू असताना अशा पद्धतीने वाहन चालवल्याने ताफ्यातील तसेच रस्त्यावरील अन्य वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच निष्काळजी वाहनचालकामुळे नागरिकांच्या आणि इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या ताफ्याभोवतीची वाहतूक आणि वाहनांची हालचाल महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे सुरक्षा ताफ्याच्या जवळून भरधाव वाहन नेणे किंवा ताफ्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणे हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार ठरू शकतो. या घटनेनंतर ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे शुभम विजय वनित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी नेमक्या किती वेगाने चालवली जात होती, ताफ्याला ओव्हरटेक करताना नेमकी परिस्थिती काय होती आणि या प्रकारामुळे प्रत्यक्षात कोणताही धोका निर्माण झाला का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून, तपासानंतर घटनेशी संबंधित अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.






