jharkhand bokaro crime 10 years rigorous imprisonment awarded to convict found guilty in rape case on the pretext of marriage nrvb
बोकारो : झारखंडमधील (Jharkhand) बोकारो (Bokaro) येथे लग्नाच्या बहाण्याने (Pretext Of Marriage) बलात्कार (Rape) करणाऱ्या तरुणाला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे (10 Years Rigorous Imprisonment). अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चतुर्थ योगेश कुमार यांच्या न्यायालयाने या प्रकरणात आरोपी उमेश कुमार उर्फ चना (Accused Umesh Kumar alias Chana) याला दोषी ठरवले आणि त्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी हा दुंडीबाग मार्केटमध्ये भाजी विकतो. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम पीडितेला द्यावी लागेल.
विशेष सरकारी वकील राकेश कुमार राय यांनी सांगितले की, आरोपीने पीडितेशी २० एप्रिल २०२० ते ३ जानेवारी २०२१ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार दिला. यामुळे दुखावलेल्या पीडितेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
[read_also content=”जल्लाद डॉक्टर, असहाय्य महिला आणि दोन्ही किडन्या गायब…असा गुन्हा यापूर्वी कधीच पाहिला नसेल! कारण ऐकून तुमचाही डॉक्टरवरचा उरलासुरला विश्वासच उडेल https://www.navarashtra.com/crime/too-much-horrible-bihar-muzaffarpur-woman-victim-kidney-theft-quack-doctor-investigation-inside-story-police-crime-nrvb-367807.html”]
नातेवाईकांनी त्यांना सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर पीडिता बरी झाल्यावर बीएस सिटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपी उमेशकुमार उर्फ चना याला दोषी ठरवले. त्यामध्ये सोमवारी हा निकाल देण्यात आला.