Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांजा तस्करांसह चार किलो गांजा जप्त, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

अंबरनाथ रेल्वे स्थानक आल्यानंतर या तरूणाला कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांच्या ताब्यात दिले. जवानांना या प्रवाशाचा संशय आला. त्यांनी त्याची झडती घेतली असता या प्रवाशाजवळ तीन किलो गांजा आढळून आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 21, 2025 | 06:05 PM
गांजा तस्करांसह चार किल गांजा जप्त, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

गांजा तस्करांसह चार किल गांजा जप्त, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

Follow Us
Close
Follow Us:

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स झाल्यानंतर भला मोठा कॅफे सुरु केला. मात्र मित्रांच्या नादात नशेच्या आहारी गेला. यात त्याने सर्व काही गमावले. मात्र कर्ज बाजारी झाल्याने त्याने स्वत: गांजाचा तस्कर बनला. गांजा तस्करी करताना कल्याण रेल्वे पोलिसांनी भावेश गायकवाड नावाच्या तरुणाला अटक करुन त्याच्याकडून चार किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा तो कोणाला विकणार होता. याचा तपास कल्याण जीआरपी पोलिस करीत आहेत.

‘निर्भया’साठी ममता बॅनर्जीं ॲक्शन मोडमध्ये; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान आरपीएफचे जवान भुवनेश्वर एक्सप्रेसमध्ये कर्तव्य बजावित असताना, एक तरुण संशयितरित्या प्रवास करताना दिसून आला. आरपीएफच्या जवानांनी या तरुणाला हाटकले. मात्र हा तरुण उत्तर देताना अडखळला . आरपीएफ जवानांनी या तरुणाकडे असलेल्या बॅगची तपासणी केली. बॅगेत त्याच्या काही वस्तू आढळून आले. त्या वस्तूंच्या खाली एका पिशवीत गांजा मिळून आला. आरपीएफ जवानांनी याची माहिती लगेचच कल्याण जीआरपी पोलिसांना दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी भावेश गायकवाड या तरुणाला लगेच ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करत हा प्रवासी धाडसाने एक्सप्रेसमधून अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत होता. या तरूणाचे धाडस पाहून जवान चक्रावून गेले. कल्याण रेल्वे स्थानकात या प्रवाशाला अंमली पदार्थासह उतरविण्यात आले. तेथे त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांची सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी हा तरूण उच्चशिक्षित कुटुंबातील एक उच्चशिक्षित सदस्य असल्याचे आढळले.

हा प्रवासी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. रेल्वे तिकीट तपासणीसाच्या तत्परतेमुळे हा प्रवासी रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रवाशाची पोलिसांनी त्यांनी गांजा कोठुन आणला. हा गांजा ते कोणाला विक्री करणार होते, या दिशेने तपास करणार आहेत. रायगड ते भुवनेश्वर एक्सप्रेस असा खिशात पैसे नसताना त्यांंनी हा प्रवास कसा केला याचीही माहिती पोलीस काढत आहेत. या प्रवाशाच्या चौकशीतून गांजा तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

भावेश हा रायगड जिल्ह्यात राहतो. तो उच्चभ्रू कुटुंबातील आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला होता. त्याने कोर्स केल्यानंतर पनवेल येथे भला मोठा कॅफे सुरु केला होता. मात्र चांगले सुरु असताना मित्रांसोबत त्याला नशेची लत लागली. या नशेमुळे त्याचा कॅफे बंद पडला. घरातील दागिने काही वस्तू विकून टाकण्याची वेळ आली. तो कर्जबाजारी झाला. आत्ता करायचे काय तर त्याने गांजाची तस्करी सुरु केली. भावेश गायकवाडला आत्ता अटक केली आहे. हा गांजा तो कोणासाठी आणि कुठे घेऊन जात होता ? याचा तपास आता कल्याण जीआरपी पोलिसांनी सुरु केला आहे.

पुण्यात कारची काच फोडून चोरी; तब्बल साडेदहा लाखांची रोकड लंपास

Web Title: Kalyan in bhubaneswar express passenger without ticket was found with three kilos of ganja sud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • kalyan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.