Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC कामगाराच्या कुटुंबांला जीवे ठार मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?

तीन वर्षापूर्वी गायकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात गायकर यांच्या पत्नीने पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली.जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका केडीएमसी कामगाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणयात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 02, 2024 | 04:23 PM
KDMC कामगाराच्या कुटुंबांला जीवे ठार मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?

KDMC कामगाराच्या कुटुंबांला जीवे ठार मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण: जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका केडीएमसी कामगाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणयात आली आहे. एकनाथ पवार असे या कामगाराचे नाव आहे. टिटवाळा पोलिसांनी कामगाराच्या कुटुंबियाला पोलिस संरक्षण दिले आहे. मात्र एकनाथ पवार कुटुंबिय भितीच्या सावटाखाली आहे. कारण धमकी देणारा व्यक्ती निलेश शेलार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. निलेश शेलार याच्या सह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली आहे. निलेश शेलार हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

टिटवाळा येथील उंबार्णी गावात एकनाथ पवार हे त्यांची पत्नी, मुलगी, आई यांच्यासोबत राहतात. ते कल्याण डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार आहेत. त्यांची मानिवली येथे ८७ गुंठे जागा आहे. या जागेपैकी दोन गुंठे जागा त्यांनी रमण गायकर यांना विकली होती. तीन वर्षापूर्वी रमण गायकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात रमण गायकर यांच्या पत्नीने एकनाथ पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली. पवार यांनी सांगितले की, जागेच्या मोबदल्यात त्यांना २ लाख ११ हजार रुपये यापूर्वीच दिले आहेत. त्याचा तपशीलही एकनाथ पवार यांच्याकडे आहे. मात्र रमण गायकर यांच्या पत्नी यांनी जागेच्या व्यवहाराची रक्कम २ लाख ११ हजार रुपये नसून २ लाख ६१ हजार रुपये असल्याचे सांगून उर्वरित पैसे द्यावे असा तगादा लावला होता.

video Call वर महिलेला कपडे काढायला लावले, नंतर 1.78 लाखांची फसवणूक केली; मुंबईतील धक्कादायक प्रकार

दरम्यान पवार यांच्या जागेवर पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु होते. त्यांना हे कळताच त्यांनी जागेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्याठिकाणी निलेश शेलार हा त्यांच्या साथीरादारांसोबत उभा होता. एकनाथ पवार यांना पाहून निलेश शेलार याने जातीवाचक शिविगाळ केली. त्याना मारहाण केली. त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली. निलेश शेलारचा साथीदार रवि निकम याने त्याच्या जवळची रिव्हा’ल्वर काढून एकनाथ पवार यांच्या कंबरेखाली लावून एकनाथ पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकनाथ पवार यांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी एकनाथ पवार यांची तक्रार दाखल करुन निलेश शेलार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ पवार यांच्या घराला पोलिस संरक्षण दिले आहे.

निलेश शेलार हा गुंड प्रवृत्तीचा इसम आहे. तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्याच्याकडूुन माझ्या कुटुंबाच्या जिवितास धोका आहे. त्याला अटक करुन त्याच्या विराेधात कठाेर कारवाई व्हावी अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली आहे.

Mumbai : अँकर ग्रुपच्या सह-संस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Kdmc worker has been threatened with death in a dispute over a land deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 04:23 PM

Topics:  

  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
4

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.