Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! पती पत्नीमध्ये मध्यरात्री वाद, संतापलेल्या पतीने केला पत्नीचा निर्घृणपणे खून; आधी गळा दाबला नंतर

कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2025 | 10:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून हत्येची माहिती दिली. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव परशुराम पांडुरंग पाटील (वय 44) असे असून, तो एका फौंड्रीत काम करतो. पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा कापून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली. हत्याकेल्यानंतर ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक कर्ली आहे. ही ५ ऑगस्टच्या मध्यरात्री महालक्ष्मीनगर, आपटेनगर परिसरात घडली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम पाटील हा मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील असून,सध्या महालक्ष्मीनगर येथे आपल्या पत्नी अस्मिता (वय 44), दोन मुले आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. आरोपी परशुराम पाटील उद्यमनगरमधील फौंड्रीत काम करत होता. त्यांची मुले बाहेर होती आणि वडील दुसर्या खोलीत झोपले होते. तेव्हाच परशुराम आणि अस्मिता यांच्यात पैश्यांच्या कारणावरून वाद झाला. त्याच वादाच्या रागात परशुरामाने त्याच्या पत्नीचा गळा दाबून बेशुद्ध केलं, त्यानंतर घरातल्या चाकूने गळा कापून तिचा खून केला. नांतर त्यांनी स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली.

वाद का झाला?

परशुरामने सांगितले, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः चं घर विकलं होते. त्यातून मिळालेली रक्कम, इतरांकडून घेतलेले हातउसने पैसे आणि मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीतून घेतलेलं प्रत्येकी एक लाख रुपयांचं कर्ज याची स्पष्ट माहिती अस्मिता देत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. मंगळवारी रात्री अशाच एका वादात ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेनंतर पाटील दाम्पत्याची दोन मुलांची लं मानसिकदृष्ट्या हादरली आहेत.आईचा म्र्यु आणि वडील तुरुंगात या धक्क्याने कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने मुलांनी बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कार केले. तर करवीर पोलिसांनी परशराम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे महालक्ष्मीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय माहिती दिली पोलिसांनी

करवीर पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पाटील मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील रहिवासी आहे. पत्नी, दोन मुले, वडिलांसह तो महालक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. तो उद्यमनगरात फौंड्रीत काम करतो. मोठा मुलगा खासगी नोकरी करतो, तर लहान मुलगा शिकत आहे. घरामध्ये सुरू असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पाच वर्षापूर्वी स्वतःच्या मालकीचं घर विकावं लागलं. हे कुटुंब महालक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला आलं, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्यामध्ये पैशांवरून वाद झाला. त्यावेळी दोन्ही मुले बाहेर गेली होती, तर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. रागाच्या भरात पाटीलने पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पत्नीचा घरातील चाकूने गळा कापला. पत्नीचा खून केल्यानंतर मोबाइलवरून 112 नंबरवर पोलिसांना फोन केला.

Pune Crime News: पुण्यात एकाच दिवशी चार घरफोड्या; साडे आठ लाखांचा ऐवज लंपास

 

Web Title: Kolhapur was shaken a midnight argument between husband and wife an angry husband brutally murdered his wife first he strangled her and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 10:48 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.