फोटो सौजन्य- iStock
शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे विशेष असते. शिक्षक हा विद्यार्थ्याला योग्य ते शैक्षणिक दृष्ट्या मार्गदर्शन करतोच मात्र त्याला मुल्यांचीही जाणिव करुन देतो.विद्यार्थ्यांच्या चूकांना दुरुस्त करण्यासाठी मदत करतो. विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी समजावून सांगतो. खरतर विद्यार्थी समाजातील चांगला माणूस होण्याकरिता शिक्षकाची भूमिका विशेषत: शाळेतील शिक्षकाची भूमिका अतिशय महत्वाची असते. असे अनेक आदर्श शिक्षक आज समाजात आहेत मात्र काही शिक्षक हे विद्यार्थ्यांना आजही मारहाण करतात. चुकीच्या पद्धतीने शिक्षा देतात. ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शारीरीक इजा होते. रागाच्या भरात शिक्षकांकडून केली जाणारी मारहाण ही विद्यार्थ्यांना धोकदायक असते. मारहाण करण्यावर प्रतिबंध असले तरीही शिक्षकांकडून जबरदस्त मारहाण केल्याच्या आणि अघोरी प्रकार केल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. केरळमध्येही अशी घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका मदरसामधील शिक्षकाने विद्यार्थ्याला इस्त्रीचे चटके दिले तसेच प्रायव्हेट पार्टवर मिरचीची पावडर लावली.
नेमक काय आहे प्रकरण?
केरळमधील कन्नूर येथील एका मदरसा शिक्षकाला गुरुवारी एका विद्यार्थ्याला गरम इस्त्रीने चटके दिल्या प्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी शिक्षकाचे नाव हे उमेर अशरफी असून या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टवर मिरची पावडर लावल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याने अलीकडेच तक्रार दाखल केली होती की अशरफीने कथित अनादर केल्याबद्दल त्याला अशापद्धतीने त्रास दिला.
या तक्रारीनंतर अशरफीने केरळमधून पळ काढत कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणातील आरोपी अशरफी हा तामिळनाडूमधील कोईम्बतूर मधून त्याच्या मूळ जिल्ह्यात परतला त्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 ला अटक केली आहे. या अटक कारवाईमध्ये आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्याला तेथून ताब्यात घेतले गेले आहे.
अशरफीला कन्नवम पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यानतंर त्याला काल दि. 8 नोव्हेंबर ला स्थानिक न्यायालयात हजर केले गेले. स्थानिक न्यायलयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अशी घटना पहिल्यांदाच समोर आली नाही. नुकतीच उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका मदरशातील शिक्षकावर १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शिक्षकाने विद्यार्थ्याला याबाबत कोणाला सांगितले तर मारहाण करू, अशी धमकीही दिली होती. पीडित विद्यार्थिनी शिक्षणासाठी मदरशात राहायची. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी फिर्याद दिली होती.