विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मिरजमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरजमधील भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे.
भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची मिरजमध्ये हत्या (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
मिरज : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे जोरदार प्रचार व सभा सुरु आहेत. राज्यामध्ये देखील राजकारण रंगले आहे. मात्र मिरजमध्ये गंभीर घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे (वय ५२, रा. मिरज) यांच्यावर आज सकाळी कुऱ्हाडीने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला. जमीन विकासक म्हणून व्यवसाय करणारे खाडे आज सकाळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर एका वादग्रस्त जमिनीत कुंपण घालण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. ऐन विधानसभा निवडणूक काळात घडलेल्या या हत्येने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, खाडे यांनी पंढरपूर रस्त्यावरील पावणेचार एकर न्यायप्रविष्ठ असणारी जमीन विकसनासाठी घेतली होती. या जागेवर कुंपण मारण्यासाठी ते काही साथीदारांसोबत संबंधित शेत जमिनीमध्ये गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक आणि सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी संशयित आरोपीने कुऱ्हाडीने सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सुधाकर खाडेंच्या खुनाच्या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली. तसेच खुनाची घटना मोबाईलमध्ये चित्रीत देखील झाली आहे. खाडे यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पथक दाखल होते.
सुमारे वीस वर्षांपूर्वी खाडे मिरजेच्या राजकारणात सक्रिय झाले. सुरवातीला ते शिवसेनेत सक्रिय होते. त्या काळात त्यांनी मिरजेतील अवैध दारु, अवैध धंद्याविरोधात आंदोलन केले. त्यानंतर ते एका बलात्कार प्रकरणात अडकले. मिरज अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणातही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होते. काही वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये सक्रिय झाले होते.
अमित शाह यांचा प्रचार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. “कॉंग्रेस पक्षाला माहिती आहे की देश जेवढा कमजोर असेल तेवढी कॉंग्रेस मजबूत होईल. आणि देश यामुळे मजबूर होईल. मागच्या 75 वर्षांच्या इतिहास जाणून घ्या. कॉंग्रेस वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करते. आणि हीच कॉंग्रेसची नीती आहे. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने कधीच दलित समाजाला एकजुट होई दिले नाही. आदिवासी आणि ST समादाला देखील वेगवेगळ्या जातींमध्ये वाटून टाकलं. त्यांची वेगळी ओळख निर्माण होऊ नये म्हणून अशी खेळी खेळली. भांडण लावून कोणाचा आवाज बुलंद होणार नाही, असा डाव कॉंग्रेसने खेळला. त्यामुळे कॉंग्रेसच्या या प्रवृत्तीपासून सावध राहावे लागेल,” असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
Web Title: Bjp udyog aghadi state president sudhakar khade was killed in miraj