सध्या महाराष्ट्रात शुल्लक कारणांमुळे एकमेकांना शिव्या दिल्या जातात. याच शिवीचे रूपांतर पुढे मारहाणीत सुद्धा होते. काही वेळेस तर वाद एवढा विकोपाला जातो की काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील वावंजे येथे घडली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया.
पनवेलमधील वावंजे येथील 60 वर्षीय याकूब खान यांचा अचानक बेपत्ता होण्याचा घटनाक्रम तासन्तास गडद होत गेला. त्यांच्या नातेवाईकांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. याकूब खानचे बेपत्ता होणे ही त्यांच्या कुटुंबासाठी एक गंभीर केस बनली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तसेच यांत्रिक मदतीचा वापर करून अधिक तपास करत होते.
घटनेच्या दिवशी, याकूब खानसोबत एक अनोळखी व्यक्ती दिसली, आणि या व्यक्तीसोबत तो एका ठिकाणी बोलताना दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, की याकूब खानसोबत स्कूटीवरून एक व्यक्ती जात होती, मात्र परतीच्या प्रवासात तीच व्यक्ती एकट्याने परत आली होती. या विचित्र घटनेचा तपास सुरू झाल्यावर पोलिसांना अनेक अंशतः संशयास्पद गोष्टी उघडकीस आल्या.
हे देखील वाचा: धक्कादायक! निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्याची हत्या, मिरजमध्ये उडाली खळबळ
पोलिसांनी तपास करत असताना एक मोठा खुलासा झाला. पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून अटक केलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले. या व्यक्तीने तपासात कबूल केलं की त्याने याकूब खानचा जीव घेतला. हे असे कृत्य करण्यामागचे कारण म्हणजे याकून खानने आरोपी व्यक्तीच्या पत्नी आणि वडिलांविरुद्ध उच्चारलेले अपशब्द, ज्यामुळे आरोपीला आपला राग आवरता आला नाही. परिणामी त्याच्याकडून चुकीचा आणि अक्षम्य गुन्हा घडला.
याकूब खान यांच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले आहे. तसेच गावात त्यांचे सांत्वन करण्यासाठी लोकं जमा होत आहे.
या घटनेनंतर, पनवेल पोलिसांकडून आरोपीवर कारवाई सुरू असून, ते संबंधित व्यक्तीला न्यायालयात हजर करणार आहेत. पोलीस तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आरोपीने पूर्ण तपासात स्पष्ट कबूल केले की त्याने एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे स्थानिक समाजात एक गोंधळ निर्माण झाला असून, याकूब खानच्या मृत्यूमुळे वावंजेतील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पनवेल पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत, आरोपीला अटक केली आहे आणि आगामी कारवाईसाठी तपास सुरू ठेवला आहे. लवकरच आरोपीला कडक शिक्षा होईल असे आश्वासन यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना दिले आहे.
फक्त साध्या वादविवादामुळे काय होऊ शकते, हे आपल्याला या घटनेमुळे समजले आहे. म्हणूनच स्वतःचं डोकं जितकं शांत ठेवता येईल तितके चांगले.