Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! बनावट पासपोर्टच्या आधारे आलेल्या 4 बांगलादेशींना अटक, 2 जणांनी मुंबईत केलं होतं मतदान

महाराष्ट्रातील मुंबई एटीएसने चार बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांसह अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएसने आणखी पाच बांगलादेशींची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे. या आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे मतदार ओळखपत्र बनवून लोकसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2024 | 04:19 PM
धक्कादायक! बनावट पासपोर्टच्या आधारे आलेल्या 4 बांगलादेशींना अटक, 2 जणांनी मुंबईत केलं होतं मतदान
Follow Us
Follow Us:

मुंबईत एटीएसने (Anti-Terrorism Squad) एका मोठ्या कारवाईत बनावट कागदपत्रांसह राहणाऱ्या ४ बांगलादेशी दहतशवाद्यांना अटक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याशिवाय एटीएसने आणखी ५ बांगलादेशींची ओळख पटवली असून, त्यांचा शोध सुरू आहे. तसेच बनावट नागरिकत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्रेही मिळवली असल्याने आरोपींनी लोकसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे एटीएसने उघड केले आहे.

या प्रकरणी एटीएसने आयपीसीच्या कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ आणि भारतीय पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ (१ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या जुहू युनिटने अलीकडेच रियाझ हुसैन शेख (33), सुलतान सिद्धियाऊ शेख (54), इब्राहिम शफीउल्ला शेख (44) आणि फारुख उस्मांगनी शेख (39) यांना अटक केली आहे.

हुसेन शेख हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. त्याने सांगितले की, आरोपी मूळचे बांगलादेशचे असून ते शहरातील वेगवेगळ्या भागात राहत होते. अनेक वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असल्याच्या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. अटक केलेल्यांव्यतिरिक्त आणखी पाच जणांनी अशाच पद्धतीने पासपोर्ट मिळवले होते आणि त्यापैकी एक जण कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता, असेही समोर आले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, अटक आरोपींना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले असून ते दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सामील होते की नाही हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे यापूर्वी 7 जून रोजी पोलिसांनी ठाण्यात नऊ बांगलादेशी महिलांना बनावट कागदपत्रांसह अटक केली होती. या महिलांना मदत केल्याप्रकरणी आणखी एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra ats arrested four bangladeshi nationals for using forged documents to get indian passports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 04:19 PM

Topics:  

  • forged documents

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.