केवळ 2 हजार रुपयांसाठी कामगाराने जाळले मालकाचे दोन ट्रक; आधी दारू प्यायला अन् नंतर...
कामठी : नागपूर-कामठी महामार्गावरील भिलगाव परिसरातील ‘अंकित पल्प्स अँड बॉई प्रायव्हेट लिमिटेड’ या औषधनिर्मिती कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा स्फोट झाला.
सुधीर रामेश्वर काळबांडे (वय 42, रा. दत्तनगर, कन्हान) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यू कामठी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत औषधनिर्मितीचे काम चालते. सुमारे 90 कामगार येथे तीन शिफ्टमध्ये कार्यरत असतात. मंगळवारी सकाळी 7 वाजता पहिली शिफ्ट सुरु झाली होती. कंपनी तीन मजल्यांवर कार्यरत आहे. तिसऱ्या मजल्यावरील एमसीसी प्लांटच्या जीएलआरमध्ये अचानक स्फोट होऊन गरम रसायनयुक्त पाणी खाली काम करत असलेल्या सात कामगारांवर पडले.
दरम्यान, या घटनेत सुधीर काळबांडे यांचा उपचारादरम्यान दुपारी एक वाजता मृत्यू झाला. तर जखमींमध्ये दिनेश टेंभुर्णे (वय 60, इंदोरा), मंगेश राऊत (वय 32, हुडकेश्वर), यूनस खान मेहबूब खान (वय ३४, कामठी), संदीप (वय 38, कन्हान), गणेश वानखेडे (वय 55, सुंदर नगर, भांडेवाडी) यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून जखमींना कामठी-कळमना रोडवरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दिनेश टेंभुर्णे आणि मंगेश राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे, झोन-5 चे पोलिस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल क्षीरसागर, न्यू कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश आंधळे, तसेच भिलगावच्या सरपंच भावना फळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, मृत आणि जखमी कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी प्रशासन आणि शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.