Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akluj Crime: ‘त्या’ खून प्रकरणातील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; अकलूजमधील घटना

धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . डोक्यात जबरी मार बसल्याने नाना वाघमोडे यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 17, 2025 | 05:31 PM
Akluj Crime: ‘त्या’ खून प्रकरणातील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; अकलूजमधील घटना
Follow Us
Close
Follow Us:

अकलूज:  राहत्या घराच्या जागेच्या वादातून फोंडशिरस तालुका माळशिरस येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन आरोपींना माळशिरस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल डी हुली यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. किसन महादेव वाघमोडे वय वर्षे २२ धर्मेंद्र महादेव वाघमोडे वय २८ वर्षे व अंकुश महादेव वाघमोडे वय ३५ वर्षे सर्व रा फोंडशिरस ता . माळशिरस अशी शिक्षा झालेल्या तीन सख्ख्या भावांची नावे असून याबाबत मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

याबाबतची हकीगत अशी की फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या शेजारी गट नं १४१३ राहण्यास आहेत.  जमिनीचा वाद होता फिर्यादीचे घर हे आरोपींच्या शेतात येत असल्याने व फिर्यादीची जनावरे आरोपी आमच्या जागेत बांधायची नाहीत असे सांगत असल्याने फिर्यादी व आरोपी यांच्यात नेहमी वाद होत होता दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी व आरोपी यांच्या त घर व जनावरे बांधण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाच्या वेळी आरोपी किसन वाघमोडे यांनी लोखंडी पाईपने फिर्यादीचे वडील नाना आण्णा वाघमोडे वय ७० वर्ष यांच्या डोक्यात मारहान केलीतर धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . डोक्यात जबरी मार बसल्याने नाना वाघमोडे यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले.

त्यानंतर त्यांना नातेपुते येथील दवाखान्यात नेले असता व तेथून अकलूज येथे दवाखान्यात नेले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत मयताचा मुलगा बापू वाघमोडे यांनी वरील तीन आरोपीच्या विरोधात नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.  या घटनेचा तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी केला व तपास करून वरील तीन आरोपींच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या खटल्यात इतर साक्षीदार तपासण्यात आले आहेत.  यात मयत यांच्या नातवाची साक्ष महत्वाची ठरली.  पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल डी हुली यांनी किरण वाघमोडे धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे या तिघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड संग्राम पाटील व ॲड सूर्यकांत ढवळे यांनी काम पाहिले.  तर फिर्यादी पक्षातर्फे ॲड राजाभाऊ वाघमोडे यांनी काम पाहिले.

अभियंत्याला लाच घेणं भोवलं; ACB ने सापळा रचून रंगेहाथ पकडलं

 

माळशिरस पंचायत समिती बांधकाम उप विभागातील कनिष्ठ अभियंता शशिकांत सयाजी चौगुले रा. माळीनगर, ता. माळशिरस, पन्नास हजाराची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात गुरुवार दि. 16/01/2025 रोजी दुपारी अडकलेला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस अधीक्षक . शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपअधीक्षक शितल दानवे, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title: Malshiras court give life imprisonment punishment to assissination akluj crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Akluj
  • life imprisonment

संबंधित बातम्या

Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…
1

Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप
2

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

अश्व धावे अश्वामागे | वैष्णव उभे रिंगणी! अकलूजमध्ये पार पडले ‘माऊलीं’चे गोल रिंगण…
3

अश्व धावे अश्वामागे | वैष्णव उभे रिंगणी! अकलूजमध्ये पार पडले ‘माऊलीं’चे गोल रिंगण…

अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार
4

अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.