स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुतीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाढण्याची जबाबदारी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या समर्थ खांद्यावर पेलणार असल्याचे दिसते आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथील कार्यक्रमासाठी रविवारी (दि. २६) अकलूज बस आगाराच्या २५ गाड्या अचानक पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकलूज बसस्थानकात प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली होती.
गुन्हेगार टोळीतील सदस्या विरूध्द यापुर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.
अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत.
सकाळपासूनच कधी उन्ह तर कधी ढगाळ तर कधी लहान पावसाच्या सरी च्या वातावरण निर्माण झाले होते. गोल रिंगण सोहळासाठी वारकरांचा वाटचालीचालीत नवचेतनय निरमान झालेने त्यानेच भर टाकली होती.
सिनाप्पा वाघमोडे यांच्या बंगल्याचे बांधकाम गणेशगाव येथे सुरु आहे. अर्धवट अवस्थेतील बांधकामात सिनाप्पा रात्री झोपले होते. रात्रीच्या वेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सिनाप्पा यांच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर वार केले.
सराटी व अकलूज (जि. सोलापूर) हे अंतर केवळ तीन किमी असल्याने हजारो वैष्णव आदल्या दिवशीच अकलूज मुकामी येतात. यामुळे अकलूजकरांवर दोन दिवस मुक्कामाची जबाबदारी येते.
स्कॉर्पिओ गाडीतून महर्षी चौकातून गिरीराज पान शॉपसमोर गाडी पार्किग केली. गाडीतून दोघे खाली उतरुन चहा पिण्यासाठी चालले असतानाच त्यांच्या गाडीच्या पाठीमागे एक स्विफ्ट डिझायर गाडी येऊन उभी राहिली.
अकलूजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी चार लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त न केल्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व गणेशगांव ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली मुंडण आंदोलन करण्यात आले.
धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . डोक्यात जबरी मार बसल्याने नाना वाघमोडे यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले.
माळशिरस पंचायत समिती येथे लाचखोर शशिकांत सयाजी चौगुले यांनी तक्रारदार यांना एक लाख रुपये लाचेची मागणी केलेली होती. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे मोजमाप व बिले काढण्याकरता पैशाची मागणी केलेली होती.
टेंभू आणि म्हैसाळ या पाणी उपसा सिंचन योजनांना मी निधी दिल्यानेच या योजना सुरू झाल्या आहेत. या देशातील शेतकरी अन्नदात्या बरोबरच इंधनदाता कसा होईल, या दृष्टीने केंद्रीय सरकार पावले उचलत…
एटीएम मशीनच्या कॅमेऱ्यावर आणि सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून सिनेस्टाईलने चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून चोरी केल्याची घटना अकलूज येथे घडली आहे.
निरेच्या पात्रामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती मोडतोड झालेल्या अवस्थेत ठेवलेली दिसली. ज्या ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत देशाच्या काना कोपऱ्यातून वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरला येते.
प्रतापसिंह चौकामध्ये स्कूटी व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात विकास अरूण रिसवडकर (वय २९ वर्षे, रा. मसुदमळा, अकलूज) व शुभम शिवाजी पांढरे (वय २९ वर्षे, रा. रा. संयुक्तानगर-शंकरनगर) हे दोघे गंभीर जखमी…
हॉटेलत जेवण देण्यास उशीर केला म्हणून गावठी पिस्तूल दाखवण्याचे थरार नाट्य अकलुजमध्ये घडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात…
सोलापूर जिल्हा युवा सेनेच्यावतीने दूध दरवाढीसाठी बाभुळगाव येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध सरकारचा निषेध करण्यात आला. गायीच्या दुधाला ४० रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७५ रुपये दर न दिल्यास दुग्ध मंत्र्यांना…