Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून खाण सुपरवायजरची आत्महत्या; स्वत:ला पेटवून घेत…

कंटेनर आतून बंद करून घेत पेटवून घेतल्याने जावेद 90 टक्के जळाला. त्याची ओळख देखील पटणार नाही, अशा स्थितीत पोलिसांनी त्याला उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2025 | 02:34 PM
रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

तुमसर : कंपनीच्या मालकीची दुचाकी परत करून येतो, असे पत्नीला सांगून गेलेल्या खाण सुपरवाझर असलेल्या एकाने आत्महत्या केली. नागपूरहून निघालेल्या खाण सुपरवायजरने कंपनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे रेकॉर्डिंग थेट फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले. त्यानंतर स्वतःला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना आंधळगाव पोलिस हद्दीतील डोंगरगाव येथील पार्श मिनरल्स खदान परिसरात घडली.

खाण सुपरवायजरने आत्महत्या केल्याची ही घटना गुरुवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस येताच आंधळगाव पोलिसांसह स्थानिकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. पोलादी कंटेनरमध्ये थाटलेल्या कार्यालयात घडलेली ही घटना सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा कयास होता.

जावेद जमील शेख (वय 49, ह.मू. तिलक वॉर्ड मोहाडी/मूळचे रा. चंद्रपूर) याचे रेकॉर्डिंग पुढे येताच घटनेने गंभीर वळण घेतले. पतीला वारंवार कॉल करूनही फोन बंद येत असल्याने फिर्यादी पत्नी नाजिया जावेद शेख (40, रा. मोहाडी) हिने परिचितांना संपर्क केला असता ही घटना उघडकीस आली. कंटेनर आतून बंद करून घेत पेटवून घेतल्याने जावेद 90 टक्के जळाला. त्याची ओळख देखील पटणार नाही, अशा स्थितीत पोलिसांनी त्याला उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले होते.

आरोपी मालकांची टोळी भूमिगत

मृताच्या रेकॉर्डिंगबाबत कळताच आरोपी भूमिगत झाले आहेत. सध्या पोलिसांना ते सापडत नाही. मात्र, तुमसर शासकीय रुग्णालयात आरोपींकडून मध्यस्थी साधण्याच्या हेतूने काही पसार इसमांनी पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने सांगितले.

मानसिक त्रास देणे, सर्वांसमक्ष प्रताडीत करणे, असा प्रकार सुरू होता. 2031 पर्यंत कंपनीचे काम चालले, या आधारावर करार करण्यात आला होता. दरम्यान, बंद पडलेल्या कंपनीत अवेळी कर्तव्य बजावण्यासाठी दबाव टाकत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

पोलिसांच्या चौकशीवर नजरा

जिल्हा न्यायालयाने अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मोहाडी पोलिसांना चौकशीच्या संदर्भात चांगलेच फटकरल्याचा रेकॉर्ड असलेल्या पोलिसांकडून जावेदच्या प्रकरणांत सगळे बारकावे हाताळून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यात सदर चौकशीवर उपनगरातील विशिष्ट समुदायाच्या शिष्टमंडळाच्या नजरा लागून आहेत.

पत्नीने मागितला न्याय

2 मे पासून मृत व त्याचे कुटुंब नागपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. जावेद शेख नागपूर येथून कंपनीच्या दुचाकीने कर्तव्याच्या ठिकाणी नियमित हजर राहत होता. घटनेच्या दिवशी देखील तो नागपूरहून कंपनीत पोहोचला होता. आरोपी वीरेंद्र त्याला वारंवार फोनवरून धमकावत होता. तसा उल्लेख फिर्यादी नाजियाने आपल्या तक्रारीत केला आहे. नाजियाने आपल्या पतीची आत्महत्या नसून कंपनीने त्यांचा जीव घेतल्याची भावना व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

Web Title: Mining supervisor commits suicide in bhandara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • bhandara news
  • Suicide case

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथे विवाहितेची आत्महत्या; कुटुंबियांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
1

कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथे विवाहितेची आत्महत्या; कुटुंबियांचा सासरच्यांवर गंभीर आरोप

Delhi Metro Suicide : सांगलीच्या दहावीच्या मुलाची दिल्ली मेट्रो स्टेशनवरुन उडी; धक्कादायक सुसाईड नोट लिहित संपवले जीवन
2

Delhi Metro Suicide : सांगलीच्या दहावीच्या मुलाची दिल्ली मेट्रो स्टेशनवरुन उडी; धक्कादायक सुसाईड नोट लिहित संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.