Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मिरा रोडवर पुन्हा धारदार शस्त्राचा थरार; पाठलाग करून तरुणाला पकडलं अन्…

जुन्या वादातून सुरू झालेला पाठलाग थेट चॉपर हल्ल्यापर्यंत पोहोचला; मानेवर वार करण्याचा प्रयत्न झाला. तरुणाने प्रसंगावधान राखून वार चुकवला, मात्र चॉपरचा घाव खांद्यावर बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 08, 2026 | 02:05 PM
Crime News: मिरा रोडमध्ये पुन्हा धारदार शस्त्राचा थरार; पाठलाग करून तरुणाला पकडलं अन् चॉपरने केला हल्ला

Crime News: मिरा रोडमध्ये पुन्हा धारदार शस्त्राचा थरार; पाठलाग करून तरुणाला पकडलं अन् चॉपरने केला हल्ला

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून तरुणाचा पाठलाग करून हल्ला
  • स्वत:चा बचाव करत असताना चॉपरचा वार खांद्यावर
  • पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल
मुंबई, मिरा रोड: जुन्या वादातून मिरा रोडमधील गोकुळ व्हिलेज परिसरात एका तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. साहिल वारसी ऊर्फ जानू आणि त्याच्या पत्नीने सनी नावाच्या तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सनीच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

जुन्या वादातून हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळ व्हिलेज परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सनी आणि साहिल वारसी यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादातून साहिल वारसी ऊर्फ जानू आणि त्याच्या पत्नीने सनीचा पाठलाग केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Accident News: गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-बोलेरोची जोरदार धडक, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ७ गंभीर

चॉपरने मानेवर वार

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी एका मित्राच्या मदतीने सनीला पकडले. त्यानंतर त्याच्यावर चॉपरने हल्ला करत मानेवर वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, सनीने प्रसंगावधान राखून वार चुकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चॉपरचा वार त्याच्या खांद्यावर बसला. या हल्ल्यात त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर जखमी सनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच मिरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी साहिल वारसी ऊर्फ जानू आणि त्याच्या पत्नीविरोधात मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: Pune News: केतनचा हात-पाय मोडून अपंग करण्याचा होता प्लॅन; डिलीट केलेल्या चॅटमधून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

हल्यामागे नेमके कारण काय?

हल्ल्यामागील जुन्या वादाचे नेमके कारण काय होते, घटनेत आणखी कोणाचा सहभाग होता का आणि हल्ल्यापूर्वी आरोपींनी काही नियोजन केले होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जुन्या वादातून चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने मिरा रोड परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Mumbai crime terror of sharp weapons returns to mira road youth chased down caught

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.