Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवासादरम्यान विदेशी पिस्तुल आणि 14 काडतुसे घेऊन जाणाऱ्या आरोपी मॉडेलला अटक

मुंबई लोकल ट्रेनमध्ये इटालियन पिस्तुल घेऊन जाणाऱ्या बिहारच्या मॉडेलला जीआरपी पोलिसांनी बोरिवली रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.सध्या पोलीस या प्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपींनी बंदूक कुठून आणली? त्याचा हेतू काय होता? या सर्व प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2024 | 06:48 PM
रेल्वे प्रवासादरम्यान विदेशी पिस्तुल आणि 14 काडतुसे घेऊन जाणाऱ्या आरोपी मॉडेलला अटक

रेल्वे प्रवासादरम्यान विदेशी पिस्तुल आणि 14 काडतुसे घेऊन जाणाऱ्या आरोपी मॉडेलला अटक

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या कायमच गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी बँगेत मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. याचदरम्यान आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये इटालियन पिस्तुल घेऊन जाणाऱ्या बिहारच्या मॉडेलला जीआरपी पोलिसांनी बोरिवली रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी अभय कुमार आणि उमेश कुमार चौरसिया या दोघांना शुक्रवारी मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावरून रेल्वेत इटालियन बनावटीचे पिस्तूल घेऊन जाण्यासाठी अटक केली आहे.

बोरिवली रेल्वे स्थानकाजवळील पुलावर एका ट्रॉली बॅगमध्ये बेकायदेशीर पिस्तूल आणि 14 काडतुसे सापडल्याप्रकरणी मॉडेल अभय कुमारला अटक करण्यात आली आहे. बोरिवली रेल्वे स्टेशन पुलावर गस्त घालणाऱ्या एका हवालदाराने एका व्यक्तीला थांबवले आणि त्या व्यक्तीने पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर कॉन्स्टेबलने त्याला पोलिस ठाण्यात आणले, तेथे तपासादरम्यान आरोपीच्या बॅगेतून एक विदेशी पिस्तूल आणि 14 काडतुसे जप्त करण्यात आली.

14 काडतुसेसह अवैध पिस्तुल

पोलिसांनी नियमित तपासणीदरम्यान मॉडेलला अटक केली. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळील पुलावर एका ट्रॉली बॅगमध्ये अवैध पिस्तूल आणि 14 काडतुसे बाळगल्याप्रकरणी अभय कुमारला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपींनी बंदूक कुठून आणली? त्याचा हेतू काय होता? या सर्व प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आरोपींकडून लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे पोलिसांनी सांगितले.

18,500 रुपयांना पिस्तूल विकत घेतले

त्याचवेळी आरोपीने पोलिसांना प्राथमिक चौकशीत ही बंदूक स्टेटस सिम्बॉल म्हणून खरेदी केल्याचे सांगितले. आरोपींनी पिस्तूल अंदाजे 18,500 रुपयांना आणि गोळ्या 5040 रुपयांना खरेदी केल्या होत्या. याप्रकरणी पोलीस अद्याप मॉडेलची अधिक चौकशी करत आहेत.

15 ऑगस्टमुळे सुरक्षा व्यवस्था कडक

या घटनेनंतर स्थानकाभोवती अधिक सतर्कता वाढवण्यात आली आहे. 15 ऑगस्टमुळे रेल्वे स्थानकावर आधीच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रवासी व संशयितांवर कडक नजर ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mumbai local model carrying country pistol illegally arrested by borivali grp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 06:48 PM

Topics:  

  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब
1

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब

Mumbai Local Updates: ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका
2

Mumbai Local Updates: ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका

Exclusive: डोळे लाल भडक अन् महिलांचा पाठलाग…! रेल्वे स्थानकांवर महिला असुरक्षित? गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3

Exclusive: डोळे लाल भडक अन् महिलांचा पाठलाग…! रेल्वे स्थानकांवर महिला असुरक्षित? गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत
4

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.