पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच...
नागपूर : प्रतापनगर ठाण्यांतर्गत त्रिमूर्तीनगर परिसरातील ओरियन स्पामध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखा (एसएसबी) ने धाड टाकून देहव्यापाराचा पर्दाफाश केला. आरोपींच्या जाळ्यातून दोन तरुणींची सुटका करत दलालाला अटक केली. तौसिफ करीम शेख (वय 26, रा. बंगाली पंजा, मस्कासाथ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर मूळ मालक पार्वती उर्फ पिंकी थापा ही फरार आहे.
त्रिमूर्तीनगरच्या मुस्कान वर्षा अपार्टमेंटमधील ओरियन स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती एसएसबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. तेथे पंटर ग्राहकाला 2 तरुणी दाखवण्यात आल्या. सौदा ठरताच पंटरने पोलिसांना इशारा दिला. दबा धरून असलेल्या पथकाने इशारा मिळताच स्पामध्ये धाड टाकली. तौसिफ पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने पिंकी थापासाठी काम करत असल्याची माहिती दिली. दोन्ही पीडित तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेदेखील वाचा : Solapur Crime News: रणवीर राऊतांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेमकं घडलं काय?
दरम्यान, आरोपी तौसिफकडून दोन मोबाईल फोन, रोख 4500, डीव्हीआर आणि इतर साहित्यासह 37590 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध प्रतापनगर ठाण्यात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरार पिंकीचा शोध सुरू आहे. आरोपीला पुढील चौकशीसाठी प्रतापनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने केली.
तरुणींकडे दीड लाखाचे मोबाईल
पीडित तरुणी सिक्कीम आणि नेपाळच्या आहेत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांना नागपुरात आणले. त्यांच्याकडे दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल मिळाले. सिक्कीमची युवती 23 वर्षांची असून, नेपाळची 29 वर्षांची आहे. ती विवाहित असून, तिला एक 8 वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती दिल्लीत काम करतो. तर पिंकी ही मूळची नेपाळची असून, ती दिल्लीला होती. काही वर्षांपूर्वी नागपुरात आली. तिने त्रिमूर्तीनगरच्या मुस्कान वर्षा अपार्टमेंटमध्ये ओरियन स्पा सेंटर सुरू केले. येथील काम सांभाळण्यासाठी तिने तौसिफला कामावर ठेवले होते.