Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच प्रेमाचा करूण अंत, प्रेयसीने जाळलेल्या प्रियकराचा अखेर मृत्यू

नाशिकमधील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११ फेब्रूवारी) प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, या घटनेतील युवक ८५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाचा मध्यरात्री मृत्यू झाला.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 14, 2022 | 12:28 PM
‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच प्रेमाचा करूण अंत, प्रेयसीने जाळलेल्या प्रियकराचा अखेर मृत्यू
Follow Us
Follow Us:

नाशिक : प्रेयसीनेच आपल्या पूर्व प्रियकराला जाळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली होती. याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. नाशिकमधील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११ फेब्रूवारी) प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, या घटनेतील युवक ८५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाचा मध्यरात्री मृत्यू झाला.

दरम्यान प्रेमदिनीच म्हणजे आज व्हॅलेंटाईनदिनी या प्रियकराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने लोहोणेर गाव हादरले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे, तसेच तिचे दोन्ही भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे व प्रसाद गोकुळ सोनवणे (सर्व रा.बी. सेक्शन, रावळगाव) यांना ताब्यात घेतले होते. व त्यांना १५ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती.

मृत तरूण गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षांपूर्वी रावळगाव  ता.मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांना येत होता.

सदर मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी लोहोणोर येथे य़ेऊन गोरखच्या डोक्यावर लोखंडी  सळईने वार केले, मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान ही घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते. त्यानंतर, देवळा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शनिवारी (दि.१२) त्यांना न्यायालयात हजर केले होते.

आज पहाटे गोरखची मृत्यूशी झुंझ संपली आणि त्याचा मृत्यू झाला. ८५% भाजलेल्या गोरखचं निधन झाल्याने  व्हॅलेंटाईन डे दिनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

Web Title: Nashik young man died on valentines day burnt by ex girlfriend nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 11:58 AM

Topics:  

  • Love Crime
  • Nashik Crime
  • Nashik News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
1

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.