
State Women and Child Rights Commissions Take Suo Motu Cognizance of Nasrapur Case
Nasrapur crime News: खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार!
नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन संजय पुराणिक यांनी केलं आहे. पुण्यातील नसरापूर भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवत राज्य महिला आयोगाने सांगितले की, हे कृत्य केवळ घृणास्प नाही तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. यामुळे समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या अमानवी कृत्य आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगालाही या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची आणि बारकाईने देखरेख ठेवण्याचे आवाहन केलं आहे. तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक साहाय्य आणि नुकसानभरपाई मिळावी, POCSO कायद्यांर्गत तातडीने या प्रकरणाचे चार्जशीट दाखल व्हावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकऱणाची सुनावणी घ्यावी, असा आग्रह आयोगाकडून करण्यात आला आहे.
Nasrapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचारानंतर भोर तालुक्यात जनक्षोभ; पुणे-सातारा महामार्ग रोखला
पुण्यातील रहिवशी असलेली चिमुरडी आजीकडे नसरापूर येथे सुट्टीसाठी आली होती. पण, खेळताना ती बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक व नागरिकांनी शोध घेतला. पण, ती सापडत नसतानाच पोलिसांना दुपारी सव्वा पाचच्या सुमारास याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील खासगी सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. दरम्यान, याघटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि भोर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामस्थ अचानक एकत्र जमा झाले तीव्र संतापाची लाट पसरली. आणि ग्रामस्थ पुणे-सातारा महामार्गावर जमा झाले. त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरू केले. जवळपास दोन ते अडीच तास रस्ता अडवून धरल्यानंतर महामार्ग जाम झाला होता. घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपीला फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.