Pranjal Khewalkar News: गेल्या आठवड्यात रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडले. तेव्हापासून खडसेंवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. त्याचवेळी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट्स आणि व्हिडीओदेखील सापडल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. यानंतर खेवलकरांच्या बचावासाठी त्यांची पत्नी रोहिणी खडसे आणि सासरे एकनाथ खडसे आता मैदानात उतरले आहेत.
रेव्ह पार्टी प्रकरणी गुरूवारी (३१ जुलै) पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. प्रांजल खेवलकरांसह इतर चार आरोपींना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. त्यानंतर आज प्रांजल खेवलकर यांचे वकील कोर्टात खेवलकरांच्या जामीनासाठी अर्ज करणार आहेत. सध्या प्रांजल खेवलकर येरवडा कारागृहात आहेत. प्रांजल खेवलकर यांना आज जामीन मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, प्रांजल खेवलकर यांनी पार्टीतील दुसऱ्या आरोपीला एका मुलीचे व्हिडिओ पाठवून “असा माल हवा आहे.’ असे म्हटल्याचे आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. इतकेच नव्हे तर पोलिस तपासादरम्यान खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही धक्कादायक व्हिडिओदेखील सापडल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात सादर केली आहे. ज्या पार्टीतून पोलिसांनी खेवलकर यांना ताब्यात घेतले, त्या ठिकाणी काही महिला देखील उपस्थित होत्या.
Raksha Bandhan: भावाला अशा प्रकारची राखी बांधा, करिअर आणि जीवनात मिळेल अपेक्षित यश
कोर्ट परिसरात बोलताना प्रांजल खेवलकर यांनी पत्नी रोहिणी खडसे यांना सांगितले की, “त्या मुलींशी माझा कोणताही संबंध नाही.” तर पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर दोघाचांही फोटो शेअर करत “सत्य लवकरच बाहेर येईल,” असे म्हटले होते. तसेच, एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “माझ्या जावयाला फसवण्यात आले आहे.” आता खेवलकर जामिनावर सुटल्यानंतर ते काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.