फोटो सौजन्य- istock
यंदा रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधन हा विधी नसून भावा-बहिणीच्या नात्याचा अतूट प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर एक धागा बांधतात, जो केवळ संरक्षणाचे प्रतीक नाही तर प्रेम, आशीर्वाद आणि आशेचा धागा देखील आहे. वास्तुशास्त्रानुसार योग्य राखी निवडली गेल्यास भावाच्या जीवनात यश आणि मानसिक शांती येऊ शकते.
राखी म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्याचा धागा आहे ज्यामध्ये प्रेम, आशीर्वाद आणि संरक्षणाची भावना बांधलेली असते. वास्तुशास्त्रानुसार राखी बांधण्यासाठी नियम काय आहेत तुम्हाला माहिती आहे का? जर योग्य रंगांची आणि डिझाइनची राखी निवडल्यास भावाला सुख समृद्धी लागेल.
महाभारतामध्ये ज्यावेळी श्रीकृष्णाचे बोट कापले गेले त्यावेळी द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा पदर थोडा फाडून त्याच्या बोटावर बांधला होता. हा पदर त्यावेळी एक संरक्षक धागा बनला. त्या दिवसापासून हे नाते सुरू झाले. ज्यावेळी द्रौपदी संकटात होती, तेव्हा श्रीकृष्ण तिच्या रक्षणासाठी पुढे आले आणि त्या धाग्याची आठवण झाली. तेव्हापासून राखी केवळ एक परंपरा नसून एक मजबूत भावनिक बंधन तयार झाले.
वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक रंग एका विशेष उर्जेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे राखीची निवड करताना योग्य प्रकारची राखीची निवड केल्यास भावाचे नशीब चमकू शकते. लाल, पिवळा आणि हिरवा रंग हे सकारात्मक उर्जेचे प्रतीक करणारे आहे. या रंगापासून बनवलेली राखी भावाला बांधल्यास सकारात्मक ऊर्जा मिळतेच त्यासोबतच जीवनातील सर्व अडथळेही दूर होण्यास मदत होते.
लाल रंगांची राखी ही शक्ती, धैर्य आणि शुभ ऊर्जा वाढवणारी असते. या रंगांच्या राखीचा संबंध भावाच्या निर्भय आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे.
पिवळ्या रंगांच्या राखीचा संबंध ज्ञान आणि प्रगतीशी तसेच बुध ग्रह आणि देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. पिवळ्या राखीचा संबंध शिक्षण आणि करिअरशी संबंधित असतो.
हिरव्या रंगांचा संबंध मानसिक शांती आणि संतुलनाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. या रंगांची राखी बांधल्याने भावाच्या जीवनातील तणाव किंवा समस्या दूर होतात. त्यासोबतच आरोग्य आणि मानसिक शांती देखील वाढते.
पांढऱ्या रंगांच्या राखीमुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तसेच ताण देखील कमी होतो.
या रंगांची राखी बांधणे टाळावे. कारण याचा संबंध नकारात्मक ऊर्जा, अडथळे आणि मानसिक गोंधळ यांच्याशी असतो.
वास्तुशास्त्रानुसार कच्च्या कापसाच्या किंवा रेशमी धाग्यापासून बनवलेली राखी भावाच्या जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता आणते. राखीचा धागा जितका नैसर्गिक असेल तितका त्याचा परिणाम चांगले असतात. प्लास्टिक किंवा रबरापासून बनवलेल्या राख्यांमध्ये भावाच्या जीवनात सकारात्मक परिणाम आणणारी ऊर्जा नसते.
वास्तुनुसार चांदी किंवा तांब्याची राखी शुभ असते त्यामुळे उर्जेचा प्रवाह सक्रिय राहतो. असे देखील म्हटले जाते की, धातू योग्य दिशा दर्शवतो.
रुद्राक्ष असलेली राखी बांधल्याने संरक्षणात्मक ऊर्जा मिळते त्यासोबतच राहू आणि केतू सारख्या ग्रहांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण देते.
त्रिशूल, स्वस्तिक, ओम किंवा शंख यांसारख्या असलेल्या राख्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या प्रकारच्या राख्या शुभ मानल्या जातात.
काही राख्यांवर ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘ओम गणेशाय नमः’ असे मंत्र लिहिलेले असतात. वास्तुनुसार, या ध्वनी लहरी नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)