Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐनपूर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू; सहा जखमी

पोलीस प्रशासन व गावकरी मंडळी यांनी जखमींना तात्काळ तेथून हलवून रुग्णालयात दाखल केले. यात दिनकर रामकृष्ण कोळी वय ६० वर्ष यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता त्यांना मयत घोषित केले. तर बाकी जखमीवर उपचार सुरू आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 23, 2023 | 09:19 PM
one died after falling under twelve carts in ainpur accident six injured nrvb

one died after falling under twelve carts in ainpur accident six injured nrvb

Follow Us
Close
Follow Us:

ऐनपूर : ऐनपूर (Ainpur) येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारा गाड्या ओढण्याची परंपरा (Tradition of pulling twelve carts) कोरोना काळ (Covid-19) वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट (Barighat) येथे बारा गाड्या ओढण्यात आल्या परंतु यात बारगाड्याचा ताबा सुटल्याने एक जणाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील (Raver Taluka) ऐनपूर येथे मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त (Marimata Yatra Utsav) बारा गाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे बारागाड्या हे ओढण्यात येत असतात,परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती.

[read_also content=”कल्याणमध्ये दोन कुमारिका मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका; अनिल पॅलेस नंबर एक लॉजिंग व बोर्डिंगमध्ये सुरू होता गोरखधंदा https://www.navarashtra.com/crime/crime-news-rescue-of-two-virgin-girls-from-prostitution-in-kalyan-anil-palace-number-one-lodging-and-boarding-business-was-going-on-nrvb-390692.html”]

अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या बारा गाड्या ओढण्यात येतात, अक्षयतृतीया निमित्त दि.२३ एप्रिल रोजी ऐनपूर येथील बारिघाट येथे या बारा गाड्या ओढण्यात आल्या. परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी यांच्या सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल,सुभाष भील,ईश्वर भील,नामदेव भील,किशोर हरी पाटील ,मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमध्ये सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे जखमी झाले.

पोलीस प्रशासन व गावकरी मंडळी यांनी जखमींना तात्काळ तेथून हलवून रुग्णालयात दाखल केले. यात दिनकर रामकृष्ण कोळी वय ६० वर्ष यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता त्यांना मयत घोषित केले. तर बाकी जखमीवर उपचार सुरू आहेत.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 23 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-23-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

त्यावेळी भगत म्हणून सोपान भील तर बगले म्हणून सुनील महाजन आणि सचिन महाजन हे सहाय्यक होते. निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील योगेश चौधरी व होमगार्ड यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: One died after falling under twelve carts in ainpur accident six injured nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2023 | 09:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.