Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेळवाकमध्ये पाटण वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा खैराच्या लाकडांसह ट्रक जप्त

आरटीजीएस, कॅश स्वरूपात ४१ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी पार्थ केशवराव राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2024 | 09:47 PM
हेळवाकमध्ये पाटण वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा खैराच्या लाकडांसह ट्रक जप्त
Follow Us
Close
Follow Us:

पाटण: पाटण वनविभागाने कोयनानगर येथे मोठी कारवाई केली आहे. गुजरातहून (वापी) चिपळूणच्या दिशेने विनापरवाना ओलीव खैराच्या लाकडाची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक (जीजे १५ झेड १०८३) पाटण वनविभागाने कराड-चिपळूण राज्यमार्गावरील हेळवाक चेकनाक्यानजीक जप्त केला आहे. या ट्रकमध्ये सुमारे १५ लाखापेक्षा जास्त किमतीची खैराची लाकडे असून ट्रकसहीत सुमारे २० लाखांचा मुद्देमाल वनविभागाने कारवाईत जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक जैनुद्दिन अहमद सिद्दिकी व क्लिनर दिनेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पाटण वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

गुजरातमधील वापीमधून विनापरवाना ओलीव खैराच्या लाकडाने भरलेला ट्रक (क्र. जी. जे. १५ झेड. १०८३) हा चिपळूणच्या दिशेने निघाला होता. याबाबत दि. २५ रोजी गोपनीय माहिती वनविभागाला समजल्यानंतर वनविभागाने तातडीने पावले उचलली. खैराच्या लाकडाचा ट्रक हा कराड-चिपळूण राज्यमार्गावरील कोयनानगर विभागातील हेळवाक येथील चेकनाक्यानजीक आला असता संशय निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांकडून ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये ओलीव खैराची लाकडे असल्याचे आढळून आले.  ट्रकसह मुद्देमाल जप्त करुन तो पाटण येथील वनविभागाच्या परिसरात लावण्यात आला आहे.

या ट्रकमध्ये असणाऱ्या खैराच्या लाकडाची किंमत अंदाजे पंधरा लाखांवर असण्याची शक्यता असून ट्रकसहीत सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल पाटण वनविभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रकचालक जैनुद्दिन अहमद सिरिकी व क्लिनर दिनेश कुमार अशा दोघांवर पाटण वनविभागात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, पाटणचे वनपाल यशवंत सावर्डेकर, पाचगणीचे वनरक्षक विशाल हरपळ, गोवारेचे वनरक्षक राम मोटे, वनरक्षक रोहित लोहार, कायम वनमजूर यशवंत बनसोडे यांनी ही कारवाई केली. वनक्षेत्रपाल राजेश नलवडे अधिक तपास करत आहेत.

गुजरातपासून ट्रक आलाच कसा?

एवढ्या मोठ्या प्रमाणात विनापरवाना खैराच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पाटण वनविभागाची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. लाखो रुपये किंमतीच्या खैराच्या लाकडाने भरलेला ट्रक हा गुजरातमधील वापीमधून चिपळूणच्या दिशेने निघाला होता. हा ट्रक चिपळूणच्या वेशीवरच हेळवाक येथे पाटण वनविभागाने कारवाई करून ताब्यात घेतला. मात्र गुजरातपासून इथपर्यंत हा ट्रक आलाच कसा? या ट्रकबाबत कोणालाही संशय कसा आला नाही की आर्थिक तडजोड करून हा ट्रक पुढे पाठविण्यात आला? असे एक ना अनेक प्रश्न यानिनित्ताने उपस्थित झाले आहेत.

तब्बल ४१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

तब्बल ४१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २०१९ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तुषार विजय साळुंखे रा. कारंडवाडी महाडिक कॉलनी (ता. सातारा), त्यांचा भाऊ जयवंत विजय साळुंखे, वडील विजय साळुंखे, मोठा भाऊ सचिन साळुंखे यांच्याकडून ऑनलाइन, आरटीजीएस, कॅश स्वरूपात ४१ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी पार्थ केशवराव राऊत (रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, पुणे) आणि राजेंद्र दत्तात्रय होळकर (रा. खडकी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.

Web Title: Patan forest department seized acacia catechu wood truck crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 09:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.