कॅफेच्या नावाखाली चालायचं 'नको ते'; पोलिसांनी धाड टाकताच तरूण-तरूणी...
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुला-मुलींना अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या एका अवैध कॅफेवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने सोमवारी रात्री धाड टाकत कारवाई केली. कठोरा रोडवरील फोझन डीलाईट या कॅफेवर ही धडक कारवाई केली.
हेदेखील वाचा : Pune School News: बदलापूर पाठोपाठ पुण्यात चीड आणणारा प्रसंग; अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक
कॅफेचा मालक दीप चितोंडे (वय 28, रा. पोटे टॉउनशिप, अमरावती) व कॅफेमध्ये काम करणारा प्रेम थोरात (वय 19, रा. विलास नगर, अमरावती) यांना ताब्यात घेतले. दोघांवरही गाडगेनगर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शहरातील कॅफेचा मालक हा मुला-मुलींना अश्लील कृत्य करण्यासाठी जागा देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, अशा कृत्यांना आळा बसावा यासाठी कॅफे चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने कॅफेची तपासणी सुरू केली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी टाकली धाड अन्…
सोमवारी कठोरा रोडवरील फोझन डीलाईट कॅफेमध्ये पैसे घेऊन गैर वापरासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे कळताच सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले व त्यांच्या पथकातील पोलिसांनी धाड टाकली.
मुलं-मुली आढळली अश्लील कृत्य करताना
कॅबिनमध्ये मुल-मुली अश्लील कृत्य करत असताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी कॅफे मालकाविरुध्द कारवाईचा बडगा उगारला. ही कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर यांच्यासह इतर वरिष्ठांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली.