Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलेक्टर होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं; “घराची चिंता करू नको, अभ्यास कर…” आईचे शब्द आठवले; प्रथमेशच्या मृत्यूने गाव सुन्न

कलेक्टर होऊन लाल दिव्याच्या गाडीतून मुलगा घरी येईल, असे स्वप्न आईने पाहिले होते; मात्र त्याचे पार्थिव ॲम्बुलन्समधून घरी आणावे लागले. आर्थिक अडचणी, शेतीचे नुकसान आणि स्पर्धा परीक्षेच्या तणावामुळे मुलगा त्रस्त होता, असा दावा प्रथमेशच्या कुटुंबीयांनी केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 10, 2026 | 05:43 PM
कलेक्टर होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं; “घराची चिंता करू नको, अभ्यास कर...” आईचे शब्द आठवले; प्रथमेशच्या मृत्यूने गाव सुन्न

कलेक्टर होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं; “घराची चिंता करू नको, अभ्यास कर...” आईचे शब्द आठवले; प्रथमेशच्या मृत्यूने गाव सुन्न

Follow Us
Follow Us:
  • कलेक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण, पार्थिव थेट ॲम्बुलन्समधून घरी
  • घरावरील कर्ज, शेतीचे नुकसान अन् परीक्षेचा प्रचंड ताण
  • कुटुंबीयांकडून आर्थिक संकट आणि आरक्षणाचा मुद्दा उपस्थित
धाराशिव: “माझा मुलगा कलेक्टर बनून लाल दिव्याच्या गाडीतून घरी येणार होता, मात्र आज त्याचे पार्थिव ॲम्बुलन्समधून आणावे लागले,” अशा शब्दांत धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख यांच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. २९ वर्षीय प्रथमेश पुण्यात राहून MPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. त्याच्या मृत्यूने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रथमेश अधिकारी होऊन घरी परतणार, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. त्यासाठी तो पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचे हे स्वप्न अधुरे राहिले. मुलाचे पार्थिव घरी आणण्याची वेळ आल्याने आईने व्यक्त केलेल्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या ठरल्या.

घराची आणि शेतीची चिंता

प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबावर काही लाख रुपयांचे कर्ज होते. त्यातच शेतीचे नुकसान झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मागील वर्षी तुरीचे पीक वाहून गेले होते. यंदा पाण्याअभावी पीक वाळून गेल्याचे प्रथमेशने आईला सांगितले होते. शेतीचे नुकसान आणि घरखर्चाची चिंता प्रथमेशला सतावत असल्याचे आईने सांगितले. “निसर्गाच्या पुढे कुणाचे चालत नाही. तू काळजी करू नकोस. तुझे दाजी तुला पैसे पाठवत आहेत. तू घरची चिंता करू नकोस, अभ्यास कर,” असे आपण त्याला समजावून सांगितल्याचे आईने भावुक होत सांगितले.

हेही वाचा: Pune:“तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” म्हणत MPSC विद्यार्थ्याचे अपहरण; गाडीत कोंबले, पुढे जे घडलं ते…

परीक्षेच्या तणावाचाही उल्लेख

प्रथमेश स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाणे आणि त्यातून निर्माण होणारी अनिश्चितता यामुळेही तो चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती आणि परीक्षेच्या तणावामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. प्रथमेशची बहीण सांगते की, तो सुमारे आठ दिवसांपूर्वी गावाकडे आला होता. त्यावेळी दोघांमध्ये गप्पाही झाल्या. अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून पुण्यात असताना त्याला वारंवार फोन केला जात नव्हता. साधारणपणे १५ दिवसांतून एकदा त्याच्याशी बोलणे होत असल्याचे तिने सांगितले.

कुटुंबीयांकडून विविध कारणांचा उल्लेख

गावाहून पुण्याला जाताना प्रथमेश नाराज असल्याचे बहिणीने सांगितले. पुण्यात पोहोचल्यानंतरही फोनवर बोलताना त्याच्या आवाजातून नाराजी जाणवत होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रथमेशच्या मृत्यूमागे आर्थिक विवंचना, शेतीचे नुकसान, स्पर्धा परीक्षेचा ताण आणि आरक्षणाचा प्रश्न कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. मात्र मृत्यूमागील नेमकी कारणे अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसमोरील ताणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Preparing for mpsc with the dream of becoming a collector death strikes mothers anguished cry leaves the village numb with shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 05:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.