
Baramati News: पिस्तुल काढले अन् डोक्यात झाडली गोळी; गोळीच्या आवाजाने अपार्टमेंट हादरले,२८ वर्षीय तरुण गंभीर
शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आविष्कारने राहत्या घरात पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून अपार्टमेंटमधील रहिवासी घाबरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आविष्कार रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तरुणाने स्वतःवर गोळी झाडल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याच्याकडे पिस्तुल कुठून आले, त्याच्याकडे त्याचा परवाना होता का, तसेच हे पिस्तुल कायदेशीर होते की बेकायदेशीर, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेपूर्वी तो कोणाच्या संपर्कात होता, त्याच्या हालचाली काय होत्या आणि या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास बारामती पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तुलासह काही महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.