Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

६ सप्टेंबरला दीड वर्षांची चिमुकली डोंगरावर एकटी सापडली. आणि तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. डॉक्टरांची भावनिक पोस्ट व्हायरल होताच अखेर आई-वडील स्वतः पोलिसांसमोर आले आणि मुलीला तिथे सोडण्यामागचे कारण सांगितले..

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 09, 2026 | 11:50 AM
Pune News: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

Pune News: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

Follow Us
Follow Us:
  • दीड वर्षांची एकटी चिमुकली सापडली डोंगरावर
  • पोलिसांनी तिला वायसीएम रुग्णालयात केले दाखल
  • डॉक्टरांच्या भावनिक पोस्टमुळे मिळाला प्रतिसाद
पुणे: देहूजवळील भंडारा डोंगरावर ६ सप्टेंबर रोजी एकटी सापडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या आई-वडिलांनी अखेर पोलिसांसमोर हजेरी लावली. ‘कोणी तरी दानशूर किंवा चांगले कुटुंब मुलीला घेऊन तिचा सांभाळ करेल’, या आशेने तिला डोंगरावर सोडल्याची कबुली त्यांनी दिली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

डोंगरावर एकटीच दीड वर्षाची चिमुकली

भंडारा डोंगरावर एकटी चिमुकली आढळल्याने ६ सप्टेंबर रोजी परिसरात खळबळ उडाली होती. अवघ्या दीड वर्षांच्या मुलीला निर्जन ठिकाणी कोणी आणून सोडले, ती हरवली आहे की तिच्यामागे बालअपहरण करणाऱ्या टोळीचा काही संबंध आहे, अशा विविध शक्यता व्यक्त होत होत्या.

डॉक्टर आणि पोलीसही भावुक

पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल केले. चिमुकलीची अवस्था पाहून डॉक्टर आणि पोलीसही भावुक झाले. तिच्याबाबत माहिती मिळावी, यासाठी डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. दरम्यान, मुलीची देखभाल करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यालाही या घटनेबाबत बोलताना अश्रू अनावर झाले. एवढ्या लहान मुलीला कोणी अशा प्रकारे एकटे कसे सोडू शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Dhule Bribery Case: लाचेची रक्कम घेतली अन् एसीबीने पकडले; दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात,तिसरा फरार

मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात हजर 

पोलिसांचा तपास सुरू असतानाच मुलीचे आई-वडील सोमवारी सायंकाळी स्वतःहून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले. सुरुवातीला मुलगी मुंबईत सापडल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र चौकशीत त्यांनी अखेर मुलीला भंडारा डोंगरावर सोडल्याची कबुली दिली. या प्रकरणी अजय शिवशंकर यादव (२३) आणि खुशबू अजय यादव (२२, दोघे रा. वासुली, मूळ उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कामगार असून खुशबू गृहिणी आहे.

हेही वाचा: Pimpri Chinchwad: ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले? महिंद्रा अँथियाला महापालिकेचा दणका

परिस्थीतीमुळे घतला निर्णय

आर्थिक अडचणींमुळे मुलीचा सांभाळ करणे कठीण झाले होते. त्यामुळे तिला एखादे चांगले कुटुंब मिळेल आणि तिचा व्यवस्थित सांभाळ होईल, या अपेक्षेने तिला डोंगरावर सोडल्याचे पालकांनी सांगितले. सध्या चिमुकली वायसीएम रुग्णालयात सुरक्षित आहे. तिच्यावर वैद्यकीय तपासणी सुरू असून डीएनए तपासणीनंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार तिची बालगृहात रवानगी करण्यात येणार आहे.  दरम्यान, या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Pune 18 month old toddler abandoned on bhandara hill parents reveal shocking reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 11:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.