Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!

Forest Crime: पुण्यातील तरुणीचा गोंदियाच्या जंगलात संशयास्पद मृत्यू! नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला दिले होते ६० लाख... चोरट्यांचा हल्ला की पैशांच्या वादातून 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग'? आईच्या खुलाशाने उडाली खळबळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 12:53 PM
Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!

Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात काम करणाऱ्या वर्षा तुरकरचा मृतदेह गोंदियाच्या जंगलात सापडला
  • मित्राला दिलेल्या ६० लाखांच्या वादातून हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
  • बनाव रचणाऱ्या मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात
Forest Crime: पुणे विमानतळावर एका खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या ३५ वर्षीय वर्षा तुरकर हिचा गोंदिया जिल्ह्यातील निर्जन जंगलात संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. चार दिवसांपूर्वी शनिवारी गोंदियातील बोंद्रानी वनक्षेत्रात वैनगंगा नदीच्या परिसरात तिचा मृतदेह आढळला होता. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा सापडल्याने हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अशातच आता वर्षाच्या पतीने आणि आईने असे काही धक्कादायक खुलासे केले आहेत की, सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

हेही वाचा: Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया ‘आयएस’ अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!

फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख रुपये

या प्रकरणात ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’ची शक्यता वर्तवली जात असतानाच, वर्षा तुरकर हिच्या पतीने मोठा दावा केला आहे. वर्षाने तिचा मित्र नितेश अग्रवाल याला १५ लाख रुपये दिले होते. तर, वर्षाच्या आईने म्हटले आहे की, वर्षाने नागपूरचा फ्लॅट विकला होता आणि बिझनेस विस्तारासाठी नितेशला तब्बल ६० लाख रुपये दिले होते. त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याची दाट शंका आईने व्यक्त केली आहे. या खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणाला आता एक नवा आणि धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे.

“त्याचाच सगळा खेळ असून त्यानेच वर्षाला संपवलं”

वर्षाच्या आईने मित्र नितेश अग्रवाल याच्यावर थेट संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला नितेशनेच फोन करून सांगितले की वर्षाला चाकू मारला आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यानेच पुन्हा फोन केला की तिला हॉस्पिटलला नेले आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरच पूर्ण संशय आहे. हा त्याचाच सगळा खेळ असून त्यानेच वर्षाला संपवले आहे,” असा आक्रोश वर्षाच्या आईने केला आहे.

हेही वाचा:Slab Collapse: “जेवणानंतर विश्रांती घेत असताना भीषण अपघात; नाशिकमध्ये ‘साई निवारा’चा स्लॅब कोसळून १५ ते १७ भाविक गंभीर जखमी!”

चोरट्यांच्या हल्ल्याचा बनाव? पोलीस कसून चौकशी करत आहेत

दिवाळीनिमित्त पुण्याहून माहेरी आलेल्या वर्षा तुरकर हिला मित्र नितेश (निलेश) अग्रवाल हा जंगलात घेऊन गेला होता. तिथे काही चोरट्यांनी वर्षाच्या पाठीत वार केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असा जबाब त्याने पोलिसांना दिला होता. मात्र, त्याच्या दाव्यावर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आता आई आणि पतीच्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तातडीने बँक खात्यांची तपासणी सुरू केली असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. पैशांच्या व्यवहारातूनच मित्राने वर्षाचा काटा काढला का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत वर्षा तुरकर कोठे काम करत होती आणि तिचा मृतदेह कोठे आढळला?

    Ans: ३५ वर्षीय वर्षा तुरकर पुणे विमानतळावर एका खासगी विमान कंपनीत काम करत होती; तिचा मृतदेह गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी वनक्षेत्रात वैनगंगा नदीच्या परिसरात आढळला.

  • Que: वर्षाच्या आईने आणि पतीने नेमका काय आरोप केला आहे?

    Ans: वर्षाने नागपूरचा फ्लॅट विकून मित्र नितेश अग्रवाल याला बिझनेससाठी ६० लाख आणि १५ लाख रुपये दिले होते; याच पैशांच्या वादातून त्यानेच तिची हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केली आहे?

    Ans: चोरट्यांच्या हल्ल्याचा संशयास्पद जबाब देणाऱ्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बँक खात्यांचे व्यवहार तपासण्यासोबतच त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Pune airport employee varsha turkar suspicious death gondia forest 60 lakh dispute sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • killing news
  • Pune Airport

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.