Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swargate Bus Depo Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम गाडेचा कोठडीचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कोठडीसाठी पुणे पोलिसांनी एकदा अर्ज फेटाळल्यानंतर गुरूवारी पुन्हा अर्ज केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2025 | 09:11 PM
Swargate Bus Depo Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम गाडेचा कोठडीचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

Swargate Bus Depo Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम गाडेचा कोठडीचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कोठडीसाठी पुणे पोलिसांनी एकदा अर्ज फेटाळल्यानंतर गुरूवारी पुन्हा अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळत आरोपीला अतिरिक्त कोठडी देण्यास नकार दिला आहे. स्वारगेट एसटी स्थानकात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता.

या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्या कालावधीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दरम्यान पुणे पोलिसांनी याप्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत केली आहे.

पण तपासात काही महत्त्वाच्या बाबींची चौकशी करावी लागणार असल्याने पोलिसांनी आरोपीची तीन दिवसांची अतिरिक्त कोठडी मागितली होती. २ एप्रिल रोजी न्यायालयात यासाठी अर्ज सादर करण्यात आला. मात्र, पोलिसांना यापूर्वीच आरोपीची पुरेशी कोठडी मिळाली असल्याचे नमूद करून न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. नंतर गुरूवारी पुन्हा पोलिसांना कोठडी देण्याबाबत फेरविचार करावा असा अर्ज केला होता. न्यायालयाने तोही अर्ज फेटाळला.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीतेचे सचिवांना पत्र

अत्याचार प्रकरणात पिडीत तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अ‍ॅड. आसिम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच पुणे पोलिसांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे, त्या पहाटे आरोपी गाडेने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तिसऱ्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार विरोधानंतर तो नराधम गाडे पळून गेला, असे तिने सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे.

मी, ओरडले… पण ते आठवले अन् घाबरले

तरुणीने पत्रात म्हटले की, घटनेच्या वेळी मी ओरडली, पण, माझा आवाज बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. अनेकांना दिलेला त्रास आठवला. त्यामुळे जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे वाटले, म्हणून मी शांत राहिले असेही तिने म्हंटले आहे.

बसमध्ये मी ओरडले पण…; स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीतेचे सचिवांना पत्र

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिसांत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला होता. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांनी गुनाट या गावातील शेतात लपून बसलेल्या आरोपी गाडेला बेड्या ठोकल्या. त्यापुर्वी तरुणीच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला गेला. खोटा नॅरेटिव्ह पसरवला गेला. त्या दोघांची ओळख होती, असेही सांगितले. तर गाडेच्या वकिलांनीच माध्यमांना तिने पैसे घेतल्याची खोटी माहिती दिली. या सर्वात मात्र, तरुणीला प्रचंड त्रासाला सामोरे जावा लागले होते.

Web Title: Pune court refuse pune police application about datta gade custody demand swargate case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • pune court
  • Pune Police
  • Swargate Case

संबंधित बातम्या

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले
1

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

नवऱ्याशी भांडण, पत्नीची कॅनॉलमध्ये उडी; धाडसी पोलिस मार्शलने वाचवले प्राण
2

नवऱ्याशी भांडण, पत्नीची कॅनॉलमध्ये उडी; धाडसी पोलिस मार्शलने वाचवले प्राण

Crime News: पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकाऱ्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल
3

Crime News: पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा; भाजप पदाधिकाऱ्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

Devendra Fadnavis: “…पोलीस दलातही सुधारणा होणे गरजेचे”; पुण्यातून नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
4

Devendra Fadnavis: “…पोलीस दलातही सुधारणा होणे गरजेचे”; पुण्यातून नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.