Pune News: मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोणावळा, शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकांची पाहणी केली. प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांतीगृह आदी सुविधा तपासल्या.
आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातचं आता स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकीलपदी ॲड. अजय सुहास मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्ण करून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी गावी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीवर (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.
स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा ताबा मिळवण्याचा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे.
स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दत्तात्रय गाडेला अटक केली. या गुन्ह्यात गाडेला २८ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
स्वारगेट अत्याचार प्रकरणात पिडीत तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अॅड. आसिम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे.
स्वारगेट बस स्थानक परिसरात २५ फेब्रुवारीला पहाटे एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आहे.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये पंधरा दिवसांपुर्वी (दि. २५ फेब्रुवारी) २६ वर्षीय तरुणीवर धमकावून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली. तीन दिवसानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली.
पुण्यातील स्वागरगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. स्वागरगेट बस स्थानकात २६ तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला होता.
रिक्षा आत आणण्यास मज्जाव केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. लहान मुलेसोबत असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी यांना बॅगा, पिशव्या घेऊन रस्त्यावर यावे लागत आहे. त्यांची गैरसोय दूर करावी…
गुन्हे शाखेने गाडे गुनाट गावात लपलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलचा शंभर एकराच्या शेतात दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र, मोबाईल मिळून आला नाही.
स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळात आयपीएस दर्जाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बसस्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही संख्येत वाढ.
पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट मंगळवारपासून सुरू केले असून, निर्जन स्थळे, टेकड्या, रेल्वे स्टेशन तसेच डार्क स्पॉट्स यांची तपासणी केली जाणार आहे.