Pune crime news: A car thief too! Garage driver robbed with car given for repair; Case registered
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच दुरुस्तीसाठी दिलेली दहा लाखांची मोटार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी आता गॅरेज चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलांच्या मित्राने त्यांना मोटार वापरण्यासाठी दिली होती. न्यायालयात ये-जा करण्यासाठी ते मोटार वापरत होते. आरोपी गॅरेज चालक त्यांच्या ओळखीचा आहे.
हेही वाचा : घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video
हांडेवाडी परिसरामध्ये गॅरेज आहे. वकिलाने मोटार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर गॅरेज चालकाने मोटार दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येईल. मोटारीचे सुटे भाग बाहेरून मागवावे लागतील, असे सांगितले. मोटार दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून, दोन महिन्यात मोटार दुरुस्त करुन देतो, असे गॅरेज चालकाने त्यांना सांगितले. जुलै महिन्यात त्यांनी मोटार दुरुस्तीसाठी दिली.
दोन महिन्यानंतर मोटार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले. तेव्हा गॅरेज बंद होते. त्यांनी चौकशी केली. तेव्हा गॅरेज चालकाने भाडेतत्त्वावर गॅरेजसाठी जागा घेलली होती. गॅरेज बंद करुन चालक निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करत आहेत.
जंगली महाराज रस्त्यावरील श्री पाताळेश्वर मंदिरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरूड भागात राहायला आहे. १२ सप्टेंबर राेजी सकाळी दहाच्या सुमारास त्याने श्री पाताळेश्वर मंदिरासमोर दुचाकी लावली होती. दुचाकी चोरून चोरटा पसार झाला. चोरलेल्या दुचाकीची किंमत ५० हजार रुपये आहे, असे तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.