पुणे: पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय तरुणासोबत घडली. तेथील तीन महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. फिर्यादी तरुण एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलांना (वय ३२, रा. दत्तवाडी) हिच्याशी व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करायचे होते, मात्र पासवर्ड विसरल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून वाद झाला आणि मारहाण झाली.
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाचा सापडला संशयास्पद मृतदेह, छातीत आणि हातावर जखमा; गोळीबाराने हत्या?
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण एका बुधवार पेठेतील इमारतीत गेला आणि तिथे तमन्नाशी बोलणी झाली. ठरल्याप्रमाणे पैशांचा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करायचा होता. मात्र, पेमेंट ऍपचा पासवर्ड आठवत नसल्यामुळे तरुणाकडून रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून तरुण आणि तमन्ना यांच्यात मोठा वाद सुरु झाला सुरुवातीला तमन्नाने शिवीगाळ केली. “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. नंतर तिच्या मदतीला तनुजा हकीमअली मौल्ला (वय ३४) आणि सोनिया गुलाम शेख (वय ३२, रा. बुधवार पेठ) या दोघी तिथे आल्या.
तिघींनी मिळून फिर्यादीवर धक्काबुक्की केली आणि त्याला बेदम मारहाण केली . या प्रकारानंतर जखमी तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पुढील तपास फरासखाना पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या तिघींविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बुधवार पेठ परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
नामांकित मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा लैंगिक अत्याचार
पुण्याच्या पिंपरी- चिंचवड येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे. ही घटना वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये घडली आहे.
‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी