जयपूरमध्ये मुलाने केली आईची हत्या (फोटो- सोशल मीडिया)
मुलाने केली आईची हत्या
राजस्थानच्या जयपूरमधील घटना
धक्कादायक घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल
Rajsthan Crime News: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. जयपूरमध्ये एका मुलाने आपल्याच आईची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलाने आपल्या आईला दंडुक्याने बेदम मारहाण केली आहे. आईने केवळ वायफाय कनेक्शन बंद केल्यामुळे मुलाने आईची हत्या केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
राजस्थान के जयपुर में एक कलयुगी बेटे ने केवल वाई-फाई के लिए अपनी मां की बेरहमी से हत्या कर दी। इस खौफनाक घटना वीडियो जमकर वायरल हो रहा है। वहीं इस घटना पर युवक के पिता जो पुलिसकर्मी हैं उन्होंने कहा कि बेटे को फांसी की सजा होनी चाहिए।#jaipurnews #crimeinindia #WifiMurder… pic.twitter.com/gLiH1FeMZb
— NavBharat Live (@TheNavbharatliv) September 17, 2025
समोर आलेल्या माहितीनुसार, आईने वायफाय कनेक्शन बंद केल्यामुळे मुलगा आणि आईमध्ये वाद झाले. या वादाचे रूपांतर हिंसेत झाले. मुलाने रागाच्या भरात आपल्या आईवर प्राणघातक हल्ला केला. मुलाच्या वडिलांनी आणि अन्य कुटुंबातील सदस्यांनी तया मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला.
मुलगा आणि आईमधील वाद इतका वाढला कीमुलाने आईचा गळा दाबला अन डोक्यावर दंडुक्याने वार केला. यामध्ये आई गंभीर जखमी झाली. त्यानंतर लगेचच आईला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या भीषण घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आह. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीला अटक
आईची दुर्दैवीपणे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी घरातून अनेक महत्वाचे पुरावे जप्त केले आहेत. पोलिस पुढील घटनेचा तपास करत आहे. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला फाशीची शिक्षा होयला हवी अशी प्रतिक्रिया आरोपीच्या वडिलांनी दिली असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2026 मध्ये या मुलाचे लग्न ठरले होते. मात्र मुलाच्या या कृत्यामुळे लग्न मोडल्यातच जमा आहे. आता लग्न कसे होणार याची चिंता परिवाराला लागून राहिली आहे. आरोपी याआधी एका ठिकाणी काम करत होता. मात्र त्यानंतर तो काही कालावधी बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी
महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी
‘आमच्याविरुद्धची केस वापस घे, अन्यथा तुला जीवानिशी ठार करू’, अशी धमकी देत घरी येऊन साहित्यांची तोडफोड करणे तसेच फिर्यादीच्या आईलाही शिवीगाळ करण्यात आली. आरोपी इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी ‘जामिनासाठी आम्हाला 50 हजार रुपये लागेल. ते तू दे’ असे म्हणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करून फायनान्स एजन्टवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना वर्ध्यातील वैशाली विहाराजवळ सावंगी मेघे येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला.