Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल

Pune Crime news live updates

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 04, 2025 | 06:39 PM
Crime News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

Today Live news on Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. असे असताना आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका रिक्षाचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघींनी प्रसंगावधान साधून धावत्या ऑटोतून उड्या मारल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

The liveblog has ended.
  • 04 Mar 2025 06:38 PM (IST)

    04 Mar 2025 06:38 PM (IST)

    नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय

    स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणातला नराधम दत्तात्रय गाडेने महिला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

  • 04 Mar 2025 04:05 PM (IST)

    04 Mar 2025 04:05 PM (IST)

    संतोष देशमुखांच्या हत्येतील आणखी एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

    संतोष देशमुखांना मारहाण करतेवेळी आरोपींनी जो पाईप वापरला होता, त्याचे १५ तुकडे सीआयडीने जमा केले होते. याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच याचा फोटोही आरोपपत्रात जोडण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना वेगवेगळ्या शस्त्रांनी मारहाण करण्यात आली होती. त्याचे काही फोटो समोर येत आहेत. सीआयडीने जे आरोपपत्र सादर केलेले आहे त्यात एका पाईपच्या १५ तुकड्यांचा फोटोही जोडलेला आहे. याच पाईपने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा आणखी एक मोठा पुरावा असल्याचे म्हटलं जात आहे.

  • 04 Mar 2025 02:25 PM (IST)

    04 Mar 2025 02:25 PM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर

    बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणात मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली, ते उघड होत आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होते, हे सीआयडीच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांची होत असलेली हत्या अनेक लोकांनी त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाहिली असण्याची शक्यता आहे.

  • 04 Mar 2025 12:52 PM (IST)

    04 Mar 2025 12:52 PM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल

    बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. तीन महिने उलटूनही एक आरोपी अजूनही फरार आहे. या क्रूर हत्येमुळे बीडमध्ये मंगळवार 4 मार्च रोजी बंद पुकारण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

  • 04 Mar 2025 11:50 AM (IST)

    04 Mar 2025 11:50 AM (IST)

    स्वारगेट अत्याचारप्रकरणी पोलिसांचा जलद तपास

    स्वारगेट अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांकडून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि पीडितेचे जबाब यांचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.

Web Title: Pune crime news live updates in marathi 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • pune crime news
  • Pune crime news in marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.