Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Pradeep Kurulkar प्रकरणात मोठी अपडेट; सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकरला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चार मे २०२३ ला अटक केली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2026 | 01:25 PM
Pradeep Kurulkar ATS Maharashtra,Pune News, DRDO Scientist

Pradeep Kurulkar ATS Maharashtra,Pune News, DRDO Scientist

Follow Us
Close
Follow Us:
  • डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावरील खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयात होणार
  • सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी एटीएसला (ATS) सक्षम न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश
  • एटीएसने आता न्यायदंडाधिकारी यू. एस. एम. अल अमूदी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल
Pradeep Kurulkar Case: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी आता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात होणार आहे. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठविल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.

सत्र न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) अधिकृत गोपनीयता कायद्यानुसार (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) सक्षम न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी हा निकाल दिला. त्यानुसार एटीएसने आता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. एस. एम. अल अमूदी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पुढील सर्व कार्यवाही आता याच न्यायालयात चालणार आहे.

Pune ZP News: दौंडला मिळाले पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद! पवार कुटुंबाचा विश्वासू चेहरा

याप्रकरणात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड. ऋषिकेश गानू व ॲड. राघव पुराणिक यांनी कार्यवाहीच्या वैधतेला आव्हान देणारा अर्ज सादर केला. त्यांनी मांडले की, गोपनीयता कायद्यामधील कलम १३ चे पालन न झाल्याने संपूर्ण कार्यवाहीत मूलभूत कायदेशीर त्रुटी आहे. या कायद्यानुसार कार्यवाहीची सुरुवात दंडाधिकाऱ्यासमोर तक्रार दाखल करूनच होणे आवश्यक आहे. केवळ पोलिस अहवाल किंवा आरोपपत्राद्वारे नाही. या तरतुदीचे पालन न झाल्यास अटक तसेच पुढील तपास व कार्यवाही बाधित ठरते. याबाबत सरकार पक्षाला उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे. त्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे.

सत्र न्यायालयातही मुद्दा उपस्थित

हा मुद्दा यापूर्वी ॲड. गानू व ॲड. पुराणिक यांनी सत्र न्यायालयातही मांडला होता. आरोप ठरविण्याच्या टप्प्यावर व दोषमुक्ती अर्जात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता की, जी माहिती दिल्याचा आरोप आहे ती माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध आहे. कलम १३ चे बंधनकारक पालन एटीएसकडून केलेले नाही. या युक्तिवादाची दखल घेत सत्र न्यायालयाने एटीएसला सक्षम न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स

 

काय आहे कलम १३

गोपनीयता कायद्यामधील कलम १३ नुसार, या कायद्यानुसार न्यायालयाने कोणत्याही गुन्ह्याची दखल घेण्यास संबंधित सरकारच्या आदेशाने किंवा अधिकृत प्राधिकरणाच्या मान्यतेने तक्रार दाखल होणे आवश्यक आहे. केवळ पोलिस अहवाल किंवा आरोपपत्र पुरेसे नसून, अधिकृत तक्रार ही कार्यवाही सुरू करण्यासाठी अनिवार्य अट आहे. ही अट न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राशी संबंधित आहे.

हे आहे प्रकरण

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकरला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चार मे २०२३ ला अटक केली होती. त्याविरोधात एटीएसने २०२३ मध्ये दोन हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. डॉ. कुरुलकरने पाकिस्तानी हेरांना कशी व काय माहिती पाठवली याची माहिती आरोपपत्रात नमूद आहे. सध्या डॉ. कुरुलकर हा येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडत आहेत.

 

 

Web Title: Pune news next hearing in dr pradeep kurulkar case scheduled for march 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.