(फोटो सौजन्य: Pinterest)
World Oral Health Day : दात निरोगी तर जीवन आनंदी! मौखिक आरोग्य म्हणजे काय? जाणून घ्या
अंकुरित धान्याची चाट
तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरित धान्याची चाट तयार करुन खाऊ शकता. हा एक हेल्दी आणि टेस्टी असा पर्याय आहे. यासाठी अंकुरलेले हरभरे किंवा मटकी घ्या. प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध हा पर्याय वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. यासाठी एका बाऊलमध्ये अंकुरलेले धान्य, बारीक चिरलेली काकडी, कांदा आणि टोमॅटो घाला. तुम्ही त्यात सफरचंद, डाळिंब आणि इतर फळे देखील घालू शकता. चवीसाठी तुम्ही मीठ, चाट मसाला आणि लिंबू घालू शकता आणि याचा आस्वाद घ्या.
दही चुडा
दही चुडा हा बिहारचा एक पारंपारिक पदार्थ आहे. यात बाजारातून पोहे विकत घेऊन ते दह्यात मिक्स करुन खाल्ले जातात. उन्हाळ्याच याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. याला शिजवण्याची किंवा उकळण्याची गरज नाही. तुम्ही ते नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकता.
सत्तू
उन्हाळा सुरू होताच लोक सत्तू खायला सुरुवात करतात. पाण्यात सत्तू मिसळून प्यायल्याने उष्णतेत पोटाला थंडावा मिळतो. तुम्ही दुधात मिसळूनही सत्तू खाऊ शकता. गोड सत्तू पाणी आणि दूध दोन्हीसोबत चांगला लागतो. खारट सत्तू लिंबू, भाजलेले जिरे, काळे मीठ, चाट मसाला, कांदा आणि हिरव्या मिरच्यांसोबत खाल्ला जाऊ शकतो. सत्तू हा पदार्थ न शिजवता तयार केला जाणारा चविष्ट पर्याय आहे.
सँडविच
न शिजवता तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कोल्ड सँडविचचाही समावेश होतो. लहान मुलांना हा पर्याय खास करुन फार आवडेल. यासाठी ब्रेडवर मेयोनीज, चटणी आणि भाज्या लावून सँडविच बनवता येतात. हे चविष्ट सँडविच काकडी, कांदा आणि टोमॅटो आणि चाट मसाला घालून चविष्ट सँडविच तयार करा.
चटणी
तुम्ही विविध प्रकारच्या चटण्या मिक्सरमध्ये वाटून भातासोबत खाऊ शकता. चटणीला फोडणी न देता देखील खाल्ले जाऊ शकते. मिक्सरमध्ये ओलं नारळ, हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, कोथिंबीर घालून छान चटणी तयार केली जाऊ शकते.
ओव्हरनाईट ओट्स
दह्यात किंवा दुधात ओट्स, आवडीची फळे आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करुन रात्रभर भिजवा आणि सकाळी नाश्त्यात याचे सेवन करा. याची चव तुमच्या सकाळची सुरुवात आणखी छान करेल आणि यामुळे पोट देखील भरलेले राहिल.






