Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandu Andekar News: पुणे पोलिसांची बंडू आंदेकरच्या घरावर धाड; सापडलं मोठं घबाड

बंडू आंदेकरच्या घरातून तब्बल ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (ज्यांची किंमत सुमारे ८५ लाख रुपये आहे), ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 12, 2025 | 09:33 AM
Bandu Andekar News: पुणे पोलिसांची बंडू आंदेकरच्या घरावर धाड; सापडलं मोठं घबाड
Follow Us
Close
Follow Us:
  • बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांनी धाड
  • आंदेकरसह आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू
  • बंडू आंदेकरच्या घरातून लाखोंची रक्कम, सोने, चांदी जप्त

Bandu Andekar News: नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या घरावर बुधवारी (१० सप्टेंबर) पुणे पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांना सोनं, चांदी, रोकड तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. झडती सायंकाळी पाच वाजता सुरू होऊन गुरुवारी (दि. ११) पहाटे चार वाजेपर्यंत चालली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. आंदेकरने आपल्या घराच्या शंभर मीटर परिसरात तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share Market Today: तुम्हीही व्हाल मालामाल! गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेडसह खरेदी करा हे इंट्राडे स्टॉक्स, बाजार तज्ञांची शिफारस

५ सप्टेंबर रोजी आंदेकरची नातू आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. झडतीदरम्यान बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील तसेच वाडेकर कुटुंबीयांतील वृंदावनी, स्वराज व तुषार यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रुपयांची रोकड, १६ मोबाईल फोन, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

तर बंडू आंदेकरच्या घरातून तब्बल ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (ज्यांची किंमत सुमारे ८५ लाख रुपये आहे), ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली. आयुष कोमकर खूनप्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांनी तब्बल ११ तास धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त केला. या झडतीत १० पेक्षा अधिक साठेखत, पॉवर ऑफ अॅटर्नी, बँकेची पासबुकं, विविध करारनामे, टॅक्स पावत्या, पेनड्राईव्ह तसेच एक कार पोलिसांनी जप्त केली आहे.

Jalgaon Crime: मुलगी शिकलेली, हुशार… पण सासरच्या छळाने तिला खचवले, अवघ्या ४ महिन्यात २३ वर्षीय मयुरीने

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. त्यांना पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी ही कारवाई केली आहे. बुधवारी या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे तपास सोपवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 आयुष कोमकर खूनप्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदाच बंडू आंदेकरच्या घरावर झडती घेतली. या झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आली असून तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुढील चौकशी सुरू आहे.

 

Web Title: Pune police raid bandu andekars house seize cash gold and silver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • crime news in marathi
  • pune crime news

संबंधित बातम्या

Ayush komkar Case update: पुण्यातील आयुष कोमकरची हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आंदेकर टोळीच्या सात जणांना अटक
1

Ayush komkar Case update: पुण्यातील आयुष कोमकरची हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आंदेकर टोळीच्या सात जणांना अटक

Pune Crime: दौंड हादरले! गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका तरुणावर जीवघेणा हल्ला, जागीच सोडले प्राण, कारण काय?
2

Pune Crime: दौंड हादरले! गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका तरुणावर जीवघेणा हल्ला, जागीच सोडले प्राण, कारण काय?

Pune Crime: आयुष कोमकर हत्या प्रकरण! ‘चुकीला माफी नाही’ पुणे पोलिसांनी आरोपींना दिला इशारा
3

Pune Crime: आयुष कोमकर हत्या प्रकरण! ‘चुकीला माफी नाही’ पुणे पोलिसांनी आरोपींना दिला इशारा

Pune Crime News : आंदेकर-गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाचे सावट कायम..!
4

Pune Crime News : आंदेकर-गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाचे सावट कायम..!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.