जळगाव मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव मयुरी गौरव ठोसर (वय 23) असे आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिचा ९ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी १० सेप्टेंबरला कोणीही घरात नसतांना मयुरीने गळफास घेत जीवन संपवलं. आतापर्यंत १० लाख रुपये माहेरच्यांनी मयुरीच्या सासरच्यांना दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
1 हजाराची लाच घेणं भोवलं; तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
माहेरच्यांनी केले आरोप?
मयुरीने आत्महत्या केल्याचे समजताच तिचे आई -वडील जळगावला गेले. ग्रामीण जिल्हा रुग्णालयात आपल्या मुलीचा मृतदेह पहिल्यानंतर या दोघांनी एकच टाहो फोडला. मयुरीच्या आईने सांगितले की, ‘मुलाकडच्यांना लहान नाही तर मोठा हॉल पाहिजे होता. लग्नात जेवायला गुलाबजाम हवा होता. आम्ही आत्तापर्यंत त्यांना 10 लाख रुपये दिले. मयुरीच्या आईने तिच्या सासूवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की,’ मयुरीची सासू गोड बोलणारी होती. तिने गोड बोलून बोलून आमच्याकडून 10 लाख रुपये उकळले. मात्र, यानंतरही सासरच्या मंडळींकडून मयुरीचा छळ सुरु होता. मयुरीने बुधवारी आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या बहिणीला फोन केला होता. त्यानंतर तिने गळफास लावून घेतला.
शाळेत पहिला नंबर
माझी मुलगी खूप हुशार होती, शाळेत तिचा नेहमी एक नंबर यायचा. ती आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकत नाही. माझ्या मुलीसोबत जे घडलं, ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत घडू नये’, असे मयुरीच्या आईने म्हटले.
अटक न झाल्यास मृतदेह स्वीकारणार नाही
या घटनेनंतर मयुरीच्या कुटुंबीयांनी पती गौरव ठोसर याच्यासह सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक न झाल्याने शवविच्छेदन करु न देण्याचा पवित्रा नातेवाईकांनी रुग्णालयात घेतला होता. जोपर्यंत मयुरीच्या सासरच्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही, असेही मयुरीच्या आई-वडिलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मयुरीच्या माहेरच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
अजून किती मयुरी, वैष्णवी बळी जातील?
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आपण विसरू शकलो नाही की आणखी एक घटना जळगावात घडली. हुंडाबळीने आता पर्यंत अनेक महिलांचा जीव घेतला आहे. काही महिलांनी आत्महत्या केली तर काहींची हत्या झाली. काही प्रकरण समोर आले तर काही अजूनही लपून आहे. काहींना न्याय मिळाला आहे तर काही अजूनही न्यायाची वाट बघत आहे. पण न्याय जरी मिळाला तरी सुद्धा अजूनही हुंडा घेणे हे थांबलेले नाही. अजूनही हुंडाबळीच्या घटना घडत आहे. समाज बदलतोय असं वरवर वाटत असलं, तरी अजूनही बरेच लोक मुलीला “जबाबदारी” समजतात आणि तिच्या लग्नात आपली अब्रू, प्रतिष्ठा आणि मान राखण्यासाठी आर्थिक ताकद ओतून देतात. पण दुसरीकडे सासरच्या मंडळींच्या अमर्याद मागण्या थांबत नाहीत. अजून किती मयुरी, वैष्णवी बळी जातील? हा प्रश्न आता समोर आला आहे.
वस्तू आणि सेवा कर विभागाची मोठी कारवाई, ७.५६ कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणी एकाला अटक