Mandar Kiwale Attack Case: शिवाजीनगर न्यायालय हल्ला प्रकरणात आणखी तिघांना अटक; एकूण आरोपींची संख्या ९ वर

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाची गती वाढवत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.
Police Arrest 3 More Conspiracy Accused in Mandar Kiwale Case
शिवाजीनगर न्यायालय हल्ला प्रकरणात आणखी तिघांना अटक; एकूण आरोपींची संख्या ९ वर
Published on: 
Updated on: 
  • कटातील आणखी ३ आरोपींना अटक

  • एकूण ९ आरोपी अटकेत व १ अल्पवयीन ताब्यात

  • २५ नोव्हेंबरचा हल्ला आणि ससूनमध्ये उपचार

Mandar Kiwale Attack Case Update: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या आता नऊ झाली असून, एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी न्यायालय परिसरातील गेट क्रमांक ४ बाहेर मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी सहा आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले होते.

Police Arrest 3 More Conspiracy Accused in Mandar Kiwale Case
Solapur Zilla Bank: सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकतर्फी विजय! १९ पैकी १८ जागांवर सहकार विकास पॅनल विजयी

पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन यांनी सांगितले की, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हल्ल्याचा कट रचण्यात सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुमार शिवाजी गाडे (वय २५), हर्षल रमाकांत साबळे (वय २४) आणि रोहित काशीनाथ धोंडगे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी आठ जणांना अटक

दरम्यान, मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांनी बुधवारपर्यंत (२५ नोव्हेंबर) आठ जणांना अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) आणखी एका आरोपीला कडेठाण (ता. दौंड) येथून अटक केली. प्रथमेश दीपक येणपुरे (वय १९, रा. कात्रज, मूळ पाबे, ता. वेल्हा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळे याच्या हत्येची चव्हाण कुटुंबियांच्या नातलगांनी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Police Arrest 3 More Conspiracy Accused in Mandar Kiwale Case
लग्नाच्या १३ वर्षांनंतर अर्जुन बिजलानी पुन्हा चढणार बोहल्यावर! पत्नी नेहासोबत अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका व्हायरल

एक वर्षांपूर्वी झालेल्या शुभम चव्हाणच्या हल्ल्याचा बदला? (Pune Shubham Chavan Case)

अवघ्या वर्षभरापूर्वी 2025 मध्ये कात्रजमध्ये शुभम चव्हाण (Shubham Chavan Case) या तरुणाचीही हत्या करण्यात आली होती. शुभम चव्हाण हा कात्रजमधील संतोषनगर परिसरातील रहिवासी होता आणि त्याचे एक रेस्टॉरंटदेखील होते. मालमत्तेच्या वादातून शुभम चव्हाणला लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली होती.

शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात घराशेजारी असलेल्या जमिनीवरून काही महिन्यांपासून वाद सुरू होते. त्याच वादातून चार जणांनी लाकडी बांबु, लाठ्यांनी मारहाण करुन शुभमची हत्या केली. त्याची हत्या करुन फरार झाले. पोलिसांनी तपास करुन चौघांनाही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून अटक केली. चौकशीत चौघांनीही शुभमच्या हत्येची कबुली दिली. पण दुसरीकडे शुभमचा भाऊ आणि त्याचे मित्रांनी मात्र शुभमच्या हत्येचा बदला घेण्याची शपथच घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा निर्धार त्याच्या भावाने केला होता. शुभमच्या हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहचला असता न्यायालयाच्या बाहेरच काही तरुणांनी त्याच्यावर सपासप वार केले.

Police Arrest 3 More Conspiracy Accused in Mandar Kiwale Case
बेकायदेशीरपणे भारतात राहणे बांगलादेशी तरूणाला चांगलेच महागात पडले; कोर्टाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा
Q

मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांनी नव्याने कोणाकोणाला अटक केली आहे?

A

हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून कुमार शिवाजी गाडे (वय २५), हर्षल रमाकांत साबळे (वय २४) आणि रोहित काशीनाथ धोंडगे (वय २२) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Q

या प्रकरणात आतापर्यंत किती जणांवर कारवाई झाली आहे?

A

या तीन नव्या अटकेनंतर प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या ९ झाली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Q

हा हल्ला कधी आणि कोठे झाला होता?

A

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर मंदार किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाला होता.