Solapur Zilla Bank: सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकतर्फी विजय! १९ पैकी १८ जागांवर सहकार विकास पॅनल विजयी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप समर्थित ‘सहकार विकास पॅनल’ने १९ पैकी १८ जागा जिंकत स्पष्ट व एकतर्फी वर्चस्व मिळवले.
 Solapur DCC Bank Election Result 2026
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकतर्फी विजय! १९ पैकी १८ जागांवर सहकार विकास पॅनल विजयी
Published on: 
Updated on: 
  • १९ पैकी १८ जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय

  • जयकुमार गोरे यांचे नियोजन आणि मोहिते-पाटील गटाला धक्का

  • माळशिरसमधून अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी

Solapur DCC Bank Election: राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजप समर्थित पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी तब्बल १८ जागांवर भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले. तर विरोधी मोहिते-पाटील समर्थित पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत विरोधी गटाच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

दुसरीकडे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सत्ताधारी नेत्यांना एकत्र आणत निवडणुकीची संपूर्ण धुरा सांभाळली होती. निकालात जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्वी ठरली. भाजप समर्थित पॅनेलने १९ पैकी १८ जागा जिंकत जिल्हा बँकेत स्पष्ट बहुमत मिळवले. हा निकाल मोहिते-पाटील गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

 Solapur DCC Bank Election Result 2026
Eye Care: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का दिसू लागतात? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतो गंभीर आजाराचा धोका

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत ‘सहकार विकास पॅनल’ने १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात १९ जागा जिंकण्याचा दावा केला होता. ‘एक-दोन जागा वगळता इतर सर्व जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील,’ असे विधान त्यांनी केले होते. निकालानंतर त्यांचा हा दावा बहुतांश खरा ठरल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने माळशिरसचा गड राखला. माळशिरस कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी झाले. मोहिते-पाटील पुरस्कृत ‘स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल’चा केवळ एकच उमेदवार निवडून आला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने १८ जागा मिळवत मोठे संख्याबळ उभे केले.

 Solapur DCC Bank Election Result 2026
Marathi New Serial: सासू-सुनेची OG जोडी पुन्हा एकत्र! ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

सर्वाधिक चुरशीची लढत अवघ्या २८ मतांनी

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बँक आणि पतसंस्था मतदारसंघातील लढत सर्वाधिक चर्चेत राहिली. भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा अवघ्या २८ मतांनी पराभव केला.