नाशिक: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेल्यावरही यातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा शोध सुरू असतानाच आतातो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. आज सकाळी कृष्णा आंधळे गंगापूर रोडवरील सहदेव नगर येथील दत्त मंदिर परिसरात उभा होता. त्याने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. नागरिकांच्या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा मोठा दावा वकील गितेश बनकर यांनी केला आहे. गितेश बनकर म्हणाले की, “सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मी दत्त मंदिराजवळ गेलो. तिथे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांपैकी एकाने मास्क खाली केला आणि मला चेहरा स्पष्ट दिसला. तो 100% कृष्णा आंधळेच होता. मी त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. त्यानंतर ते दोघे मखमलाबादच्या दिशेने निघून गेले.”
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज होणार सुनावणी; राज्यभरातील जनतेचे लागले लक्ष
वकील म्हणून 18 वर्षांचा अनुभव असल्याने गुन्हेगारांना ओळखण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दाव्यामुळे पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आता कृष्णा आंधळे खरोखर नाशिकमध्ये लपला आहे का? पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांनी दुचाकीवरून कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. गंगापूर पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आंधळे किती वाजता आला, किती वेळ थांबला आणि कुठे गेला याचा तपास सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींना सोबत घेऊन पोलिस शोध घेत आहेत
त्यांनी दिलेल्या वर्णनानुसार संशयित दुचाकी आणि व्यक्तींची पडताळणी सुरू
गंगापूर पोलिसांनी तीन पथके शोधासाठी रवाना केली
सीसीटीव्हीच्या आधारे आंधळेचा मागोवा घेण्याचे प्रयत्न
कृष्णा आंधळे अद्याप नाशिकमध्येच आहे का, तो कुठे लपला आहे, याचा शोध पोलिसांकडून वेगाने घेतला जात आहे.
नोकरीतील प्रमोशनसाठी वापरा 7 सोप्या ट्रिक्स, बॉसचं मन जिंकूनच चढाल वरची पायरी