गुगलवरून संपर्क करणे पडेल महागात
शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच पोलीस कारवाईची भीती घालून सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. याचदरम्यान आता ओडिशातील कटक येथून सायबर फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या बँक खात्याला चोरट्यांनी लक्ष्य करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा केला आहे.
बुधवारी कटकमधील एका खासगी रुग्णालयाच्या बँक खात्यातून सायबर घोटाळेबाजांनी 29 लाख रुपये लंपास केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर घोटाळेबाजांनी हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्याऐवजी त्यांच्याच बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटकही केली आहे.
हे सुद्धा वाचा: ओडिशा हादरलं ! झोपेत असताना तीन महिलांसह पाच जणांची हत्या; ‘तो’ हत्यार घेऊन आला अन्…
सायबर पोलिसांनी आणखी दोन आरोपींचा शोध सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तत्काळ फसवणूक करणाऱ्यांची बँक खाती बंद केली आहेत. फसवणूक करणाऱ्यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. याआधी 16 ऑक्टोबर रोजी ओडिशाच्या राजधानीत पोलिसांच्या गुप्त माहितीमुळे सायबर फसवणुकीचा मोठा कट उधळून लावला होता.
ओडिशामधील सुंदरपाडा येथील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून सिम बॉक्ससारखे उपकरण सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून सत्य जाणून घेण्यासाठी त्यांची चौकशी सुरू आहे. सुंदरपाडा भागातील कांचन अपार्टमेंटच्या ए ब्लॉकमधील अपार्टमेंट क्रमांक 205 मध्ये बनावट कॉल सेंटर सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार अपार्टमेंटमध्ये बऱ्याच दिवसांपासून कॉल सेंटर चालवले जात होते. ठोस सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलीस आणि एअरफील्ड पोलीस स्टेशनने आज छापे टाकले आहेत. या रॅकेटमध्ये कोणाचा हात आहे आणि किती दिवसांपासून हे रॅकेट सुरू होते, याचा तपास सायबर पोलीस स्टेशन करत आहे.
हे सुद्धा वाचा: हेळवाकमध्ये पाटण वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा खैराच्या लाकडांसह ट्रक जप्त
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेले सहा जण सायबर फसवणुकीसाठी लोकांना लिंक पाठवत होते असे उघड झाले आहे. यासोबतच पोलिसांचे सायबर तज्ज्ञ या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत आणि प्रत्येक आवश्यक माहिती गोळा करत आहेत. जेणेकरून आरोपींशी संबंधित इतर लोकांचीही माहिती मिळू शकेल.
गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या डिजिटल अटक आणि सायबर फसवणुकीशी संबंधित घटना पाहता, सरकारने या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने डिजिटल अटक आणि सायबर फसवणूक हाताळण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. एमएचए अंतर्गत सुरक्षा सचिव या समितीवर देखरेख ठेवत आहेत. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. MHA च्या I4C शाखेने सर्व राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल अटकेच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.