
Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाइंड दिल्लीत जेरबंद; पबमध्ये उडवले दीड लाख, पोलिसांना घामावरून ओळखलं
एका रात्रीत पबमध्ये दीड लाखांचा खर्च?
दिल्लीत पोहोचल्यानंतर परशुरामने एका रात्रीत पबमध्ये तब्बल दीड लाख रुपये उधळल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर तो दिल्लीतील एका ठिकाणी छोले-भटुरे खात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या मागावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पथकाने साध्या वेशात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
Crime News: तीन महिने माहेरी होती अश्विनी; तरीही फोनवरून होत होता कथित मानसिक छळ? वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं
पोलिसांना घामावरून ओळखलं!
परशुरामला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक साध्या वेशात त्याच्या मागावर होते. मात्र, आरोपी पोलिसांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होता. दिल्लीतील वातावरणात पोलिसांच्या पथकातील तिघांना सारखा घाम येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांच्या देहबोलीवरून हे तिघे महाराष्ट्रातून आले असावेत, असा संशय त्याला आला. पोलिसांचा संशय आल्याने तो सावध होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपीने पोलिसांची चाहूल घेतली असतानाही त्याला पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
Crime News: नवी मुंबईतील कामोठे परिसरात संतापजनक घटना; सर्व विद्यार्थी उतरल्यावर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा घेतला गैरफायदा
घराभोवती सीसीटीव्हीचे जाळे
तपासादरम्यान मुख्य आरोपीने गावातील घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारल्याची माहिती समोर आली आहे. या कॅमेऱ्यांचा थेट प्रवेश त्याच्या मोबाइलवर असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे घराच्या परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा पोलिसांची हालचाल दिसताच त्याला तात्काळ माहिती मिळत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याशिवाय बीडमधील एका वसाहतीतही या टोळीचा वावर असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस तपासासाठी तेथे गेल्यानंतर स्थानिक नागरिक आणि महिलांकडून पोलिसांवर दगडफेक केली जात असल्याची माहितीही तपास यंत्रणेकडून समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा तपास पुढे नेताना पोलिसांनी टोळीच्या हालचाली, आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर या आंतरराज्य टोळीच्या आणखी कारवायांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.