माझ्या वाटणीची जमीन मला दे म्हणणे भोवले! १४ वर्षे शिक्षा भोगून सहा महिन्यांपूर्वीच सुटका झाली; मात्र सख्ख्या भावानेच...

१४ वर्षे तुरुंगवास भोगून सहा महिन्यांपूर्वीच सुटका झाली; मात्र जमिनीचा हिस्सा मागणे जीवावर बेतले! सांगोल्याच्या झापाचीवाडीत सख्ख्या भावाने काठीने वार केल्याने नामदेव गारळे यांचा मृत्यू; आरोपी तुकाराम गारळेला तीन दिवसांची पोलीस कोठडी.
Land Dispute Murder Stick Attack
सौजन्य फोटो - सोशल मिडीया Land Dispute Murder Stick Attack
Published on: 
Updated on: 
  • जमिनीच्या वादातून भावाने काठीने मारहाण करत केली हत्या

  • १८ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू

  • आरोपी तुकाराम गारळेला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

सांगोला: एका खून प्रकरणात तब्बल १४ वर्षे कारावासात घालवण्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच सुटका झाली. मात्र, नव्या आयुष्याची सुरुवात करत असतानाच भयंकर घडलं. सामाईक जमिनीच्या हिश्शाच्या वादातून सख्ख्या भावानेच डोक्यात काठीने मारहाण करून हत्या केली. नामदेव केराप्पा गारळे (वय ५५) असे झापाचीवाडी येथील मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Land Dispute Murder Stick Attack
मध्यरात्री दीड वाजता रक्ताचा सडा! आईला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीचे वार अन्...

नेमकं प्रकरण काय?

नामदेव गारळे हे आटपाटी येथील कृष्णा बंडगर खून प्रकरणात शिक्षा भोगत होते. तब्बल १४ वर्षे कारागृहात घालवल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच ते बाहेर आले होते. आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, सामाईक जमिनीच्या वाटणीचा प्रश्न त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. आपल्या हक्काच्या जमिनीचा हिस्सा मिळावा, यासाठी नामदेव वारंवार आपला भाऊ तुकाराम याच्याकडे तगादा लावत होते.

जमिनीच्या हिश्शावरून वाद अन् जीवघेणा हल्ला

१८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास नामदेव पुन्हा एकदा भाऊ तुकाराम यांच्या घरी गेले. 'माझ्या वाटणीची जमीन मला दे,' असा त्यांनी आग्रह धरला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात तुकाराम यांनी हातातील लाकडी काठीने नामदेव यांच्या डाव्या कपाळाच्या वरच्या बाजूला जोरदार प्रहार केला. या घावात नामदेव यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यावेळी भावजय जनाबाई यांनीही शिवीगाळ केल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.

Land Dispute Murder Stick Attack
बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...

उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या नामदेव यांना तातडीने सांगोला येथे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डोके, डावा हात, डावी मांडी आणि डाव्या डोळ्याजवळ त्यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. मृत्यूशी झुंज देत असतानाच, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:५० च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर मृत नामदेव यांच्या मुलाने सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत चुलते तुकाराम गारळे याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजय राऊत करीत आहेत.

Q

सांगोल्यातील झापाचीवाडी येथे नेमकी काय घटना घडली?

A

सामाईक जमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाने लाकडी काठीने डोक्यात मारहाण केल्याने ५५ वर्षीय नामदेव केराप्पा गारळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Q

नामदेव गारळे यांची तुरुंगातून सुटका कधी झाली होती?

A

आटपाटी येथील खून प्रकरणात १४ वर्षे कारावास भोगल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच त्यांची सुटका झाली होती.

Q

या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

A

सांगोला पोलिसांनी आरोपी तुकाराम गारळे याला अटक करून न्यायालयात हजर केले, जिथे त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत पुढील तपास करत आहेत.