बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज या प्रकरणात वाल्मीक कराडला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आता या प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. कोर्टाने वाल्मीक कराडचा ताबा एसआयटील घेण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडचा ताबा एसआयटीने घेतल्यावर आता उद्या त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोर्ट वाल्मीक कराडला किती दिवसांची कोठडी सुनावणार हे पहावे लागणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा दावा एसआयटीने केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात खंडणीचा गुन्ह्यात देखील वाल्मीक कराड एसआयटीच्या ताब्यात होता.
वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात केज कोर्टाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यासोबतच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परळीतील वातावरण तापलं आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे.
हेही वाचा: बसवर दगडफेक, समर्थकांचा राडा; वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं
परळीत कराड समर्थकांनी सकाळपासून निदर्शने सुरू केली आहेत. संतापलेल्या समर्थकांनी टायर पेटवून आपला रोष व्यक्त केला आहे. याचदरम्यान, एका महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तापले. कराडच्या ७५ वर्षीय आई आणि पत्नीनेही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे.
वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे. वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले.