Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नालेसफाई दरम्यान विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू; मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात पोलीस आणि वीज वितरण कंपनी कारवाई करणार का ?

कल्याण पूर्व भागातील तिसगाव गावठाण येथील सिंकदर चाळीच्या बाजूला एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याच्या बाजूला गटार आहे. इमारतीच्या शेडवर काही विजेच्या तारा लटकलेल्या होत्या. या वेळी दोन कामगार शेडच्या बाजूच्या गटाराची सफाई करीत होते. दोघांपैकी ऋतिक कुरकुटे हा गटार सफाई करण्यासाठी गटारात उतरला होता.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 22, 2023 | 08:35 PM
नालेसफाई दरम्यान विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू; मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात पोलीस आणि वीज वितरण कंपनी कारवाई करणार का ?
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : नालेसफाई (Drain Cleaning) करताना एका कंत्राटी कामगाराला (Contract Worker) विजेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (The shocking incident of his death due to electric shock) कल्याण पूर्व (Kalyan East) भागातील तिसगाव गावठाण (Tisgaon Gavthan) परिसरात आज दुपारी घडली आहे. ऋतिक कुरकुटे (Hrithik Kurkute) असे या तरुणाचे नाव असून कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र निष्काळजीपणामुळे या निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचे समोर आले आहे. आता महावितरण वीज कंपनी आणि पोलिस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 June 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/daily-horoscope-22-june-2023-today-rashibhavishya-in-marathi-sagittarius-will-gain-respect-in-the-society-family-responsibilities-will-be-fulfilled-nrvb/”]

कल्याण पूर्व भागातील तिसगाव गावठाण येथील सिंकदर चाळीच्या बाजूला एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याच्या बाजूला गटार आहे. इमारतीच्या शेडवर काही विजेच्या तारा लटकलेल्या होत्या. या वेळी दोन कामगार शेडच्या बाजूच्या गटाराची सफाई करीत होते.

दोघांपैकी ऋतिक कुरकुटे हा गटार सफाई करण्यासाठी गटारात उतरला होता. त्याचा सहकारी कामगार हा काही दूर कामासाठी गेला असता ऋतिक याचा जोराचा आवाज आला. त्याच्या सहकारी कामगाराने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ऋतिक याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गटार सफाई करीत असताना त्याने इमारतीच्या संरक्षक पत्र्याचा आधार घेतला.

[read_also content=”‘या’ घरगुती उपायांनी दारूच्या व्यसनातून सुटका करणे होईल सोपे https://www.navarashtra.com/web-stories/how-to-get-rid-of-alcohol-addiction-these-home-remedies-will-make-it-easy-to-get-rid-of-it-nrvb/”]

त्याठिकाणी असलेल्या वीजेच्या तारेचा जोरदार झटका त्याला लागल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र विजेची तार कोणाची होती. बिल्डर वापर होता की चाळकरी वापरत होते. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सखोल तपास करुन कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात ठोस कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Shocking incident contract worker dies due to electric shock during drain cleaning will the police and mahavitaran company take action against those responsible for the death kalyan crime nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 08:34 PM

Topics:  

  • Kalyan Crime
  • Shocking incident

संबंधित बातम्या

ती एक घटना अन् संपूर्ण शहर झालं उद्ध्वस्त! मानवच काय तर प्राणीही राहिले नाही; रक्त उकळलं, कवट्या फुटल्या….
1

ती एक घटना अन् संपूर्ण शहर झालं उद्ध्वस्त! मानवच काय तर प्राणीही राहिले नाही; रक्त उकळलं, कवट्या फुटल्या….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.