Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! आधी काढत होते न्यूड फोटो, मग करत होते ब्लॅकमेलिंग; अडकल्या 300 हून अधिक मुली, कॉन्व्हेन्ट शाळेत सुरु होता ‘हा’ प्रकार…

ही गँग कधीपासून सक्रिय होती. त्यांनी जमा केलेले फोटो आणि व्हिडीओ हे एखाद्या पॉर्न वेबसाईटला तर दिले गेले नाहीत ना, त्यांच्या जाळ्यात आणखी किती मुली सापडल्या आहेत. या सगळ्याचा तपास आता करण्यात येतो आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 29, 2023 | 07:09 AM
धक्कादायक! आधी काढत होते न्यूड फोटो, मग करत होते ब्लॅकमेलिंग; अडकल्या 300 हून अधिक मुली, कॉन्व्हेन्ट शाळेत सुरु होता ‘हा’ प्रकार…
Follow Us
Close
Follow Us:

आगरा– शाळेसह कॉलेज (School college) असलेल्या कॅम्पसमध्ये अल्पवयीन तरुणी  (Girls) आणि तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या गँगचा (Gang) पर्दाफाश करण्यात आलं आहे. या मुलींना ब्लॅकमेल करणारी सगळे आरोपी हे त्या कॉन्व्हेन्ट शाळेचे विद्यार्थी असल्याचं आणि अल्पवयीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गँगकडे या शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 300 हून अधिक मुलींचे न्यूड फोटो सापडले आहेत. त्यानंतर ही गँग त्या मुलींना ब्लॅकमेल करीत असे. या ब्लॅकमेलिंगला वैतागलेल्या मुलींनी अखेर एका स्वयंसेवी संस्थेच्या आधाराने पोलिसांत तक्रार जाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली, त्यानं पोलीसही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान, ही गँग कधीपासून सक्रिय होती. त्यांनी जमा केलेले फोटो आणि व्हिडीओ हे एखाद्या पॉर्न वेबसाईटला तर दिले गेले नाहीत ना, त्यांच्या जाळ्यात आणखी किती मुली सापडल्या आहेत. या सगळ्याचा तपास आता करण्यात येतो आहे. हा सगळा संघटित गुन्हेगारीचा प्रकार तर नव्हता ना, याचाही पोलीस तपास घेतायेत.

अनोळखी नंबरवरुन कॉल करुन ब्लॅकमेलिंग

या प्रकरणात आत्तापर्यंत 34 जणांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केले आहेत. त्यातल्या 9 विद्यार्थ्यांची माहितीही पोलिसाांनी काढली आहे. एका पीडित विद्यार्थिनेन सांगितले की जवळच्याच एका शाळेतील 12 वीचा विद्यार्थी तिचा बॉयफ्रेंड होता. एकमेकांशी भेटत असताना तो तिचे फोटो आणि व्हिडीओ काढीत असे. त्यानंतर काही महिन्यांनी कळले की, एका अनोळखी नंबरवरुन क़ॉल आला. त्यात तिच्या न्यूड फोटोंचा संदर्भ देत तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. अधिक चौकशी केली तर या मुलीच्या बॉयफ्रेंडनंच हे फोटो आणि व्हिडीओ संबंधित आरोपींना मिळाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. जेव्हा या प्रकरणातील पीडित तरुणीनं तिच्या ब़यफ्रेंडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं थेट हात वर केलेत.

एका स्वयंसेवी संस्थेनं केला पोलिसांशी संपर्क

त्यानंतर ब्लॅकमेल करणारा तरुण या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर त्या अनोळखी नंबरवरुन अनेक मुलांचे कॉल येण्यास सुरुवात झाली. जेव्हा तिनं हा सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीशी शेअर केला, तेव्हा तिलाही हाच अनुभव आल्याचं समोर आलं. फोनचा डेटा हॅक होण्यासोबतच, न्यूड व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करण्यात य़ेत होतं. त्यानंतर या घाबरलेल्या मुलींनी पोलिसांत न जाता एका स्वयंसेवी संस्थेत जाऊन हा प्रकार सांगितला. आपले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर या संस्थेनं पोलसांशी संपर्क केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर यामागे मोठं रॅकेट असल्याचं समोर आलंय. आता या प्रकरणात सामील असलेल्या 9 मुलांची नावं आणि पत्ते पोलिसांनी मिळाले आहेत.

300 हून अधिक मुली सापळ्यात

या आरोपींच्या लॅपटॉपमध्ये 300 पेक्षा जास्त मुलींचे न्यूज व्हिडीओ आणि फोटो असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत या संस्थेनं बाल आयोग आणि महिला आयोगाचेही दरवाजे ठोठावले आहेत. काही एडिट कलेल्या अश्लील फोटोंच्या आणि काही चॅटच्या आधारे आरोपी या मुलींचं लैगिंक शोषण करु पाहत होते, अशीही धक्कादायक माहिती या मुलींच्या याबाबत पुढं आलीय. विरोध केला तर घरातून उचलून घेऊन जाण्याची धमकी या मुलींना फोनवर देण्यात येत असे. त्यामुळं या मुली घाबरुन हा प्रकार कुटुंबीयांनाही सांगत नव्हत्या. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी सायबर सेल या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात हा सगळा प्रकार समोर आलेला आहे.

Web Title: Shocking news first they were taking nude photos then they were blackmailing more than three hundred girls trapped convent school started this type

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2023 | 07:09 AM

Topics:  

  • Nude Photos

संबंधित बातम्या

”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा
1

”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.